भाविक करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
नगरपंचायतच्या वतीने महिला शिबिर व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहरातील महिलांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्याचा सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी एकत्रित रित्या विविध योजना राबविण्यात येत आहे.
सर्व शासकीय यंत्रणाचे प्रतिनिधी एका छताखाली एकत्र विविध प्रकारचे योजनेचा लाभ धानोरा शहरातील लाभार्थींना देण्यात आले. मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन नगरपंचायतचे उपाध्यक्ष ललित बरच्छा यांच्या हस्ते करण्यात त्याच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पौर्णिमा सयाम तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार राहुल पासुंदर, प्रितीश मगरे, मुख्याधिकारी नगरपंचायत धानोरा महिला व बालकल्याण सभापती देवांगणी चौधरी, कल्याणी गुरुनुले,अलका माशाखेत्री, जयश्री थुल, यामिनी पेंदाम, बुरसे, धाईत, प्रतिभा गुंडावर आदी उपस्थित होते.
यावेळी विविध विभागांचे स्टॉल लावून लाभार्थींना विविध योजनेचा लाभ देण्यात आला. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.