बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी येथील 332, प्रदक्षिणारोड, फुटवाले धर्मशाळा येथे सुतार समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.
या महामेळाव्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास तथा धुळे जिल्हा पालकमंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, उद्योग मंत्री उदय सामंत पुणे जिल्हा कलेक्टर राजेश देशमुख यांचेसह सुतार समाजाचे विद्यमान आमदार संजय रायमुलकर उपस्थित राहणार आहेत.
या महामेळाव्यास राज्यातील 36 जिल्ह्यामधून प्रत्येक घराघरातून सर्व सुतार समाज बांधवांनी उपस्थित रहावे – असे आवाहन पत्रकार संरक्षण समिती जिल्हा उपाध्यक्ष,, दैनिक लोकमत पत्रकार बाळासाहेब सुतार यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी येथे दि.24 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या महामेळाव्यास इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील तमाम सुतार समाज बांधवांनी उपस्थित रहावे.
महाराष्ट्र राज्यातून सर्व सुतार समाज बंधू-भगिनींनी आवर्जून उपस्थित रहावे.असे आवाहन महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय समाज समन्वयक समितीचे कार्यकारी संचालक विद्यानंद मानकर सर व पत्रकार बाळासाहेब सुतार यांनी केले आहे.