शासकीय आधारभूत पिकांची नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तालुक्यातील मोठ्या गावाला नोंदणी केंद्र उपलब्ध करून देण्यात यावे :- युवक काँग्रेसची मागणी

 

 प्रेम गावंडे

 उपसंपादक

दखल न्युज भारत

              मुल :- शासकीय आधारभूत नोंदणीची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत आहे. आजपर्यंत शेतकरी शेतातील उत्पन्न काढण्यात व्यस्त असल्यामुळे शेतकऱ्यांना नोंदणी करता आली नाही. आता शेतकऱ्यांचे उत्पन्न निघाले परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शासकीय नोंदणी केंद्रात तालुक्यातील शेतकरी एकाच वेळी आपल्या पिकांची नोंदणी करण्यासाठी आली असता प्रचंड गर्दी होत आहे.

        अशातच गरीब शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी दिवसभर नोंदणीसाठी ताटकळत राहवे लागत असल्याने त्यांचा वेळ वाया जात असून आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना शासकीय पिकांची आधारभूत नोंदणी सुलभ होण्यासाठी तालुक्यातील मोठ्या गावांतील ग्रामपंचायत किंवा इतर शासकीय ठिकाणी नोंदणीची व्यवस्था करून दिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल व त्यांची आधारभूत नोंदणीची प्रक्रिया सुलभ होईल.

        करिता सदर निवेदनाची तात्काळ दखल घेऊन शासन स्तरावरून वरील मागणीची पाठपुरावा करून पूर्तता करावी करीता माननीय तहसीलदार साहेब मुल यांचे मार्फत माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन सोपवण्यात आले.

       निवेदन देताना युवा काँग्रेसचे प्रशांत उराडे, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष पवन निलमवार, बेंबाळचे सरपंच चांगदेवजी केमेकार, मेघनाथ आरेकर, हिमांशू आरेकर, विक्रम गुरनुले, ईश्वर कोरडे तथा युवक काँग्रेसचे अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.