विध्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा.. — सोडे शासकीय आश्रम शाळा येथील घटना.. — जिल्हाधिकारी घटना स्थळावर..

प्रा.भाविक करमनकर 

 तालुका प्रतिनिधी धानोरा 

         शासकीय आश्रम शाळा सोडे येथे विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याने विद्यार्थ्यांना दिनांक 20 डिसेंबरला ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे 106 विद्यार्थ्यांना भरती करण्यात आले होते.

        त्यापैकी 47 विद्यार्थ्यांना गडचिरोली येथे रेफर करण्यात आले.उर्वरित विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे यांच्यावर उपचार सुरू आहे.

         सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक आहे.तरीपण आज परत 17 विद्यार्थी बाधित झाले.त्यांना मळमळ,उलटी,पोटदुखी यासारखे लक्षण दिसून आल्याने त्यांना सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे भरती करण्यात आले.

         बाधित विद्यार्थ्यांची संख्या आता एकूण 123 झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.गजबे यांच्या मार्गदर्शनात उपचार सुरू आहेत.

          भाजपा तालुका अध्यक्ष लताताई पुंगाटे यांनी ग्रामीण रुग्णालयला भेट देऊन विद्यार्थ्यांची चौकशी केली व डॉक्टरांना योग्य उपचार करण्यास सांगितले.

          तसेच आज दुपारी 21/ 12/ 2023 ला 

अन्नाचे नमुने तपासणी करिता नागपूर येथे पाठविण्यात आले आहे.

**

जिल्हाधिकाऱ्यांची भेट.. 

        गडचिरोली जिल्हाधिकारी यांनी सोडे आश्रम शाळा येथे भेट देऊन पाहणी केली व शाळेतील अधीक्षक,अधीक्षिका, मुख्याध्यापक आणि स्वयंपाक तयार केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे बयान घेण्यास सांगितले असल्याचे मुख्याध्यापक मंडलवार यांनी फोनवरून माहिती दिली.