जातीयवादी शक्तीने आंबेडकरांच्या नावाचे नामफलक काढले…. — नवरगांव वासीय बौद्ध बांधवांनी गाव सोडले…

ऋषी सहारे

   संपादक

गडचिरोली :- चामोर्शी तालुक्यातील नवरगाव (कुनघाडा ) येथील बौध्द बांधवांनी गेल्या दोन वर्षापासुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे नामफलक आंबेडकर वार्डातील चौकात नव्हे त्याच्या बाजुला गावठाण जमीनीवर, दुर्गे यांच्या घरासमोर लावला होता.

         तश्या प्रकारचे ग्रामसभेचा ठरावही झालेला असुन सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी पोलीस स्टेशन चामोर्शी s D PO गडचिरोली यांना वारंवार तक्रार करून सदर नामफलक पोलीसाच्या ताफ्यानी व ग्रामपंचायत च्या तत्कालीन बॉडीनी हटविला आहे.

गाव सोडण्यासंबंधाने वरील व्हिडिओ मध्ये माहिती..

        आज दि. २१ डिसेंबरला सदर प्रकार घडल्यामुळे नवरगाव गावातील संपूर्ण बौध्द बांधवानी आपल्या मुला बाळा सहीत नाव सोडून बैलबंडीने जात आहेत. कुठे जात आहेत हे अजुनही समजू शकते नाही.

        परंतु जातीयवाद्याच्या जाचाला कंटाळून संविधान कर्त्याच्या नावाला विरोध करण्याऱ्या लोकांचा निषेध करून बौध्द बांधव गाव सोडून जात आहेत. सदर घटना हि महाराष्ट्रातील पहिलीच घटना होय.