निरा नरसिंहपुर दिनांक:21
प्रतिनिधी,:- बाळासाहेब सुतार,
गिरवी तालुका इंदापूर येथे खुले आम बेधडक अवैध दारूचे धंदे चालू आहेत.याकडे पोलीस प्रशासन यांनी लक्ष घालावे गिरवी येथील महिला माता भगिनींची पोलीस प्रशासनाकडे दारू बंद करून महिलांना न्याय मिळवून द्यावा या साठी क्रांती महिला ग्राम संघटना गिरवी यांची मागणी आहे.
पतीराजा दारूच्या व्यसनामुळे अनेक माता भगिनींचे प्रपंच उघड्यावर पडल्यामुळे महिलांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.
महिलांचे पतीराज दारूच्या नशेत राहून प्रापंचिक जास्त प्रमाणे हानी होऊ लागलेली आहे.हररोज दोघांमध्ये भांडण निर्माण होऊन अनेकांचे प्रपंच धुळीला मिळालेले आहेत. या साठी सर्वत्र अवैध दारूचा धंदा,सुरू करणारे जबाबदार राहातील.आशी महिलांनी मीडियाशी दिलेली प्रतिक्रिया आहे.
पत्नीच्या पतीला दारूचे लागलेले व्यसन कमी करण्यासाठी पत्नीला जिवापाड त्रास सहन करावा लागत आहे.गिरवी गावातील दारूचे धंदे बंद करण्यासाठी महिलांनी इंदापूर पोलीस स्टेशनला धडक भेट देऊन दिनांक 14/12/ 20 22 रोजी लेखी स्वरूपाचे पत्र क्रांती महिला ग्राम संघ गिरवी यांच्या वतीने15 ते 20 महिलांनी पुढाकार घेऊन निवेदन सादर केलेले आहे.
तरीसुद्धा राजरोस दारू विक्री खुले आम चालू आहे.
गिरवी गावातील महिलांना न्याय न मिळाल्यास इंदापूर पोलीस स्टेशन यांच्या समोर धरणे बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा महिला संघटनेने दिलेला आहे.
या बद्दल इंदापूर पोलीस स्टेशन कोणती भूमिका घेणार याकडे सर्व गावातील महिलांचे लक्ष लागलेले आहे.