रामनगर गुरफुडे लेआऊट येथे नवरात्रोत्सव…  — कलश यात्रा काढुन घटस्थापना करून नवरा त्रोत्सवाची सुरूवात. 

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

कन्हान : – मॉ जगदम्बा मंदीर रामनगर गुरफुडे ले आऊट कन्हान येथे मॉ जगदम्बा सेवा समिती व उत्सव समिती रामनगर कन्हान व्दारे कन्हान नदी पात्रातुन कलशात पावन जल घेऊन कलश यात्रा मंदीरात येऊन कलशाच्या जला ने मातेचे अभिषेक करून घटस्थापना करून विविध धार्मिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

       अश्विन शु.१ रविवार (दि.१५) ऑक्टोंबर ला दुपारी २ वाजता कन्हान नदी पात्रातुन कलशात पावन जल घेऊन कलश यात्रा मंदीरात येऊन कलशातील जला ने मातेचे अभिषेक करून सायं.५ वाजता घट स्थापना करून नवरात्रोत्सवाची सुरूवात करण्यात आली.

      सोमवार (दि.१६) सायं. ७ वा. धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, मंगळवार (दि. १७) ला महिला मंडळाचे भजन, बुधवार (दि.१८) ला दुपारी २ वा. रांगोळी स्पर्धा व सायं.७ वा.महाआरती, गुरुवार (दि. १९) ला दुपारी २ वा.व्यंजन स्पर्धा, शुक्रवा र (दि.२०) सायं ७.३० वा. माँ भगवती जस जागरण ग्रुप नागपुर व्दारे जस गायन, शनिवार (दि.२१) ला दुपारी ३ वा. चित्रकला, सामान्य ज्ञान व इतर स्पर्धा, रविवार (दि.२२ ) ला सायं. ७ वा. नृत्यसंध्या, सोमवार (दि.२३) ला दुपारी ३ वा. हवन पुजन, सायं.७ वा. नवकन्या भोजन व महाप्रसाद, मंगळवार (दि.२४) ला सायं. ७ वा. दस रा महोत्सव व बक्षिस वितरण, बुधवार (दि.२५) ला दुपारी १२ वा. घटविसर्जन करण्यात येईल. दररोज सकाळी ९ वाजता व सायंकाळी ७ वा. आरती, प्रसाद वितरण आणि दुपारी व सायंकाळी क्रमाक्रमाने माऊ ली महिला भजन मंडळ हनुमान नगर, रुख्मिनी महि ला भजन मंडळ गणेश नगर, श्री राधे राधे सत्संग महि ला भजन मंडळ गणेश नगर, श्री अरुणोदय भजन मंडळ कन्हान यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

        नवरात्रोत्सव कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मॉ जगदम्बा सेवा समिती व उत्सव समिती रामनगर कन्हान चे गजानन राठी, सुनिल लाडेकर, राजेश माहुरकर, चंपा लाल छलिया, शालिक वडे, मुरलीधर नानोटे सह माँ जगदम्बा महिला मंडळ, माँ जगदम्बा युवा मंडळ राम नगर गुरफुडे ले आऊट कन्हान चे सर्व पदाधिकारी, सदस्य व नगरवाशी परिश्रम घेत सहकार्य करित आहे.