युवराज डोंगरे/खल्लार

दर्यापूर(बनोसा)शहरातील कुख्यात गुन्हेगार धनराज पुंडलिक खत्री वय 32 वर्ष याला एक वर्षाकरीता एमपीडीए अन्वये अमरावती येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.

धनराज खत्री विरुध्द जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न करणे, चोरी घातक हत्यारांनी दुखापत, फौजदारी पात्र कट,शांतता भंग करणे, हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

यापूर्वीही त्याला पोलिसांकडून तडीपार करण्यात आले होते. मात्र काहीही परिणाम न झाल्याने जिल्हा पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी धनराज खत्रीच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करुन तो मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता.प्रस्ताव मंजुरीनंतर दि 20 डिसेंबर रोजी त्याला ताब्यात घेऊन त्याला अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षांसाठी स्थानबध्द करण्यात आले.

जिल्हा पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक आशिष शिंदे, पोहेकॉ अमोल देशमुख, दर्यापूरचे प्रभारी ठाणेदार विनायक लंबे यांनी सदरची कारवाई केली.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News