वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे
वाशिम:-आज दि.२०/१२/२०२२ रोजी विवेकानंद युवा मंडळ लाडेगाव व अनुभव शिक्षा केंद्र वाशिम यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मौजे लाडेगाव येथे वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांची ६६ वी पुण्यतिथी आयोजित करण्यात आली.या पुण्यतिथीमध्ये लाडेगाव गावातील 50 गोरगरीब निराधार महिलांना साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला. त्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंदिरामध्ये वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.या उपक्रमामध्ये लाडेगाव येथील गोरगरीब कुटुंबांना,अनाथ व एकल महिला यांना साडी देऊन महिलांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून मा.परशुराम सुरजुसे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.आशिष धोंगडे (अनुभव शिक्षा केंद्र अमरावती वाशिम जिल्हा प्रशिक्षक) मा.विनायकरावजी सवाई, अहमद खान पठाण,प्रवीण ढवक, रमेश गणेशपुरे,सुकेश इंगळे,आकाश सवाई,अभिषेक धोंगडे,अक्षय सुपनेर व लाडेगाव ग्रामस्थांची उपस्थिती होती.लाडेगाव येथील तुकडोजी महाराज महिला भजन मंडळ या उपक्रमामध्ये उपस्थित होते.अशा प्रकारे वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांची ६६ वी पुण्यतिथी लाडेगाव येथे अपंग,एकल महिला आणि गोरगरीब महिलांना साडी चोडी देऊन महिलांचा सत्कार करू पुण्यतिथी साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे आयोजन विवेकानंद युवा मंडळ व अनुभव शिक्षा केंद्र वाशिम यांच्या माध्यमातून करण्यात आले होते.अशा प्रकारे वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली..
आशिष धोंगडे
वाशिम प्रतिनिधी
दखल न्युज भारत