पारशिवनी शहरात आकर्षित बनले एकमेव पिंकबुथ महिला मतदान केंद्र… — सखी मतदान केंद्र…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

       २०२४ विधानसभा सार्वत्रिक निवडणुक अंतर्गत 59 – रामटेक विधानसभा मतदार संघात,दोन सखी मतदार केंद्र (पिंक बुथ) बनविण्यात आले होते.

        त्यापैकी एक पारशिवनी शहरातील हरीहर विद्यालय प्राथमिक शाळा खोली क्र. 04 मधील मतदान केंद्र क्र. 176 मध्ये बनविण्यात आले होते.

        पारशिवनी शहरातील सखी मतदान केंद्र (पिंक बुथ) निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्देशानुसार व नगर पंचायत पारशिवनी मुख्याधिकारी श्री.नितीन लुंगे यांच्या मार्गदर्शनात पारशिवनी नगरपंचायत टिमने आकर्षक मंडप व्यवस्था,फुगे आणि फुलांनी पिंक बूथ सजविण्यात आले होते.

        त्याचप्रमाणे दोन सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले होते.प्रथम मतदान करण्याकरीता येणाऱ्या मतदारांचे स्वागत हरीहर विद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या आकर्षक वेशभुषेतील लेझीम नृत्याने पिंक बुथच्या प्रवेश द्वारा जवळ गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात येत होते. 

       यावेळी नगर पंचायत पारशिवनी प्रशासकीय अधिकारी भाग्यश्री देवरे (बावीस्कर) मँडम,कर निरिक्षक निखील ढोले,ममता भिमटे,अनुप पोहुरकर व इतर कर्मचारी यांनी नियोजन करून सजावट केली.

       हरीहर विद्यालयातील खोली क्र. 04 मधील मतदान केंद्र क्र. 176 याचे व्यवस्थापनाची जबाबदारी सर्व महिला कर्मचारी यांच्यावर देण्यात आली होती.

        मतदान केंद्राध्यक्ष श्रीमती कीर्ती निंबाळकर (मुख्य अध्यापिका) यांचे मार्गदर्शनाने मतदान अधिकारी मुक्ता रहाटे, शांतशिला मेश्राम,रेणुका बोंद्ररे इत्यादींनी व पोलीस महिला कर्मचारी यांनी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडून सर्वांनी मतदान प्रक्रीया पूर्ण केली.