नागपूर दक्षिण – पश्चिम मध्ये चुरशीची लढत… — प्रफुल्ल गुडधे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोडला घाम.. — नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचाच दिसतोय दमखम…

प्रदीप रामटेके 

 मुख्य संपादक 

          महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री,माजी विरोधी पक्षनेते आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण – पश्चिम मतदार संघातून नेहमी विधानसभा निवडणूक लढत आले आहेत आणि त्यांचा नेहमी विजय झाला आहे.

        २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सुध्दा त्यांनी नागपूर दक्षिण – पश्चिम विधानसभा मतदारसंघातूनच विधानसभेची निवडणूक लढविली आहे.

         त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे उमेदवार असलेल्या प्रफुल्ल गुडधे पाटलांनी विधानसभेचे मैदान लढविले आहे.

               या विधानसभा निवडणुकीत,दक्षिण-पश्चिम मतदार संघात बहुजन समाज मतदार एकवटल्याने व काँग्रेस पक्ष उमेदवारांच्या बाजूने एकसंघ ताकदीने शेवटपर्यंत राहिल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चांगलीच गोची झाली आहे.

          या मतदारसंघात कधी नव्हे एवढी चुरशीची लढत काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडधे पाटलांनी केली आहे.

             नागपूर हे जगप्रसिद्ध असलेल्या पवित्र दिक्षाभूमीचे इतिहासिक स्थळ असून महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे.

            अशा महत्वपूर्ण शहरातील दक्षिण – पश्चिम विधानसभा मतदारसंघातंर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधे पाटलांची लढत झाली आहे.

          मात्र,प्रफुल्ल गुडधे पाटील हे दक्षिण – पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विजयाच्या उंबरठ्यावर आहेत,असे तेथील मतदारांचे म्हणणे आहे.

           परंतु या मतदार संघात विविध पत्रकारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने बातम्या प्रकाशित केल्या असून तेच विजयी होणार असे भाकीत केले आहे.

         येत्या २३ नोव्हेंबरला मत मोजणी असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती मताच्या फरकानी जिंकतात किंवा हरतात ते कळेलच!

          याचबरोबर नागपूर शहर सह,नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाचा विचार केल्यास यावेळी महाविकास आघाडीच्या बाजूंनी मतदार असल्याचे पुढे आले आहे.

        महायुतीच्या बऱ्याच उमेदवारांना या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी नाकारले असल्याचा मतमोजणी नंतरचा कल असेल.