चंद्रपूर जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघाचा निकाल कुणाच्या बाजूने येणार? — धाक ईव्हीएम मशीनचा?

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

              वृत्त संपादीका 

        महाराष्ट्र राज्यातंर्गत रुपयांच्या गाजावाजात काल पार पडलेली विधानसभा निवडणूक ईव्हीएम मशीन मध्ये सर्व उमेदवारांचे विजय-पराभव बंद करून गेली.

        येत्या २३ नोव्हेंबरला मत मोजणी असून बऱ्याच उमेदवारांना ईव्हीएम मशीनचा धाक निर्माण झाला आहे.

        काही मतदार संघात वाढीव असलेल्या ईव्हीएम मशीन,सर्व विधानसभा उमेदवारांच्या उपस्थितीत मतप्रक्रिया झालेल्या ईव्हीएम मशीन स्ट्रांग रुममध्ये पोहोचण्याच्या पुर्वी,सिसिटिव्हि कॅमेराच्या देखरेखीखाली शिलबंद करण्यात आल्या आहेत काय आणि त्या ठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे काय? हा गरम मुद्दा मतदारात चर्चेचा विषय ठरत आहे.

          मात्र,चिमूर विधानसभा मतदारसंघाकडे अख्या देशाचे लक्ष लागून असले तरी यावेळी भाजपाला चिमूर विधानसभा मतदारसंघातील जागा गमवावी लागणार आहे,हे मतदारांच्या विश्वासपुर्वक चर्चावरुन दिसून येते आहे..

        ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार बाजी मारणार आहेत तर काँग्रेस खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाकडे चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांच्या नजरा लागलेल्या आहेत.

          चंद्रपूर मतदारसंघात आमदार किशोर जोरगेवार यांचा पराभव होणार अशी मतदारात चर्चा सुरु झाली आहे,मात्र निवडणूक निकालानंतरच त्यांच्या प्रतिनिधित्वाचे भविष्य पुढे येईल.

        बल्लारपूर मतदारसंघातंर्गत अनुभवी व राजकीय परिपक्वता असलेले ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार गड कायम राखण्यास यशस्वी होणार? यावर मतदार उघडपणे बोलायला तयार नाहीत.

         राजूरा मतदार संघात माजी आमदार अँड.वामनराव चटप आणि काँग्रेसचे पक्षाचे आमदार सुभाष धोटे यांच्यात थेट लढत होत आहे‌.यामुळे या विधानसभा मतदारसंघात निवडणूक जिंकलेलाच बाजीगर ठरत असतो, हे आजपर्यंतचे तेथील मतदारांचे गुपिते आहेत.