आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोग हाच संविधानिकरित्या प्रशासकीय अधिकाराने सर्वशक्तिमान असतो…
आणि त्याच आचारसंहितेच्या काळात,मतदानाच्या एक दिवस अगोदर जर केंद्रीय आणि राज्याचा सत्ताधारी असलेल्या भाजपाचा राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे जर दिवसभर नोटांची बंडले आणि नोटांचे लिफाफे स्वतःच्या हाताने वाटप करत असेल….
त्याचे पुरावे सापडून सुद्धा मुख्य निवडणूक आयोग मौन धारण करत असेल तर,त्या विनोद तावडेवर गंभीर लोकशाही खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक करत नसेल,त्या संबंधित उमेदवाराची उमेदवारी रद्द करुन त्या संबंधित पक्षाची मान्यताच रद्द करत नसेल….
तर निवडणूक आयोगानेच आमच्या लोकशाहीचा गळा घोटलेला आहे..
त्याचप्रमाणे नोटांची बंडले वाटणारे आणि घेणाऱ्यांनी सुद्धा या लोकशाहीचा गळा घोटलेला आहे.
एक फसणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी भाषणातून 23 तारखेच्या निकालाचे सुतोवाच दिलेलेच आहेत की,हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रात होईल.कारण EVM सेटिंग अगोदरच झालेली असणार…..
20 तारखेची निवडणूक ही केवळ औपचारिकता होती हेच सिद्ध होण्याची शक्यता आहे…
लारजेस्ट पार्टी म्हणून भाजपा येईल,त्यांच्यामागे शेपटाप्रमाणे हतबल होऊन अजित पवार आणि शिंदे जातील. महाविकास आघाडी काट्याची टक्कर समजून आपसातच भेदून संपून जाईल. आम्ही मात्र ( महाराष्ट्रीयन जनता ) उंदीर आणि मांजराच्या टॉम अँड जेरीच्या खेळाची नपूंसक होऊन टाळ्या वाजवत मजा घेण्यात समाधान मानू…
असे जर झालेच…..
तर मुख्य निवडणूक आयोगाला माझे आणि भारतीय जनतेतर्फे खुले आव्हान असेल…….
की तुम्ही,23 तारखेच्या निकालानंतर केवळ पाचच दिवसानंतर नियोजन करुन झारखंड आणि महाराष्ट्रातील कोणत्याही प्रत्येकी पाच मतदारसंघात उमेदवार सुद्धा तेच ठेऊन बॅलेट पेपरवर निवडणूक पुन्हा घेऊन दाखवा.आणि त्याचे निकाल 23 नोव्हेंबरच्या निकालाशी तुलना करा.एवढेच नव्हे तर मतदानाच्या टक्केवारीची सुद्धा तुलना करा..
या प्रयोगातून तुम्हाला निकाल जमीन अस्मानाच्या फरकाने पराभूत उमेदवार जिंकतील आणि विजयी घोषित झालेले उमेदवार पराभूत होतील एवढेच काय डिपॉजिट सुद्धा विजयी उमेदवाराचे जप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत..!
हे जर प्रयोगातून सिद्ध नाही झाले,तर अनंत भवरेला तुम्ही फासावर लटकवा किंवा स्वतः गळफास लावण्यास मी तयार असेल.
हे माझे ( संविधाननिष्ठ भारतीय नागरिकाचे ) खुले आव्हान तुम्ही ( मुख्य निवडणूक आयुक्त ) स्वीकारा.मी स्वीकारलंय….
असे जर करत नसाल,तर येणाऱ्या 2029 च्या निवडणुका आम्ही EVM वर होऊ देणार नाही.त्यासाठी स्वातंत्र्ययुद्धसारखे देशभर रान उठवून जनजागृती करू…..
आम्हाला आमच्या मताचा हक्क सुरक्षित ठेवायचा आहे. त्याची तयारी म्हणजे मताच्या अधिकाराबरोबरच संविधान जनजागृती सुद्धा तितक्याच मोलाची आहे.ती सुद्धा आम्ही जाती व धर्माच्या पलीकडे जाऊन एक भारतीय जनता म्हणून करणार आहोत……
ते सुद्धा लगेच 26 नोव्हेंबर 2024 च्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या संविधान दिनापासून आणि 26 जानेवारी 2025 च्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानेच ….
केवळ आणि केवळ या कुटनीतीवर आधारित असलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या नितिभ्रष्टतेमुळे, सनदी नोकर शहांच्या भ्रष्टाचारामुळे आमचे संविधान आणि लोकशाही ICU मध्ये गेल्यामुळेच..
यांनी नोटांच्या बंडलामुळे लोकशाहीचा गळा घोटला…….
म्हणूनच……
आता यापुढे रस्त्यावर उतरून EVM ला मातीत गाडूनच, संविधान जागृती देशाची प्रगती या घोषणेनुसारच या देशात संविधान पुनःरुजीवन क्रांती …..
****
विनंती :- ही पोस्ट जास्तीत जास्त व्हायरल झालीच पाहिजे….
****