अमान क़ुरैशी
जिल्हा प्रतिनिधि
सिंदेवाही – आफ्रोट संघटना तालुका शाखा सिदेंवाहीच्या वतीने जिल्हाधिकारी चंद्रपूर तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. चंद्रपूर यांना,तहसिलदार व संवर्ग विकास अधिकारी सिदेंवाही यांच्या मार्फत,”वेतनवाढ देण्यात येवू नये यासंबंधाने निवेदन पाठविण्यात आले आहे.
अनुसुचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे किंवा ते अवैध ठरल्यामुळे अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढीचा लाभ न देण्याबाबतचे निवेदन शिष्टमंडळा तर्फे देण्यात आले.
संदर्भिय शासन पत्र दिनांक 10/11/2023 अन्वये अधिसंख्य पदावरील कर्मचान्यांना 11 महिन्यानंतर एक दिवसाचा तांत्रिक खंड असल्यामुळे वेतनवाढ अनुदेय नाही.यावरुन अभिसंख्य पदावरील वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी / कर्मचा-यांना वार्षिक वेतनवाढीचा लाभ न देण्याबाबत संघटनेची धारणा पक्की झाली आहे.करीता अशा अधिसंख्य प्रदावर कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांना वार्षिक वेतनवाढीचा लाभ न देण्याबाबतचे निवदेन राजु ताडाम अध्यक्ष आफ्रोट संघटना शाखा सिंदेवाही तथा मंगलदासजी मेश्राम तथा मा सुनील ऊईके सल्लागार तालुका शाखा गट,दिपक म्हैस्कर,केवलदास गेडाम,प्रमोद कोवे व ईतर सदस्यांनी निवेदनाच्या माध्यमातून शासनाकडे केलेली आहे.