गडचिरोली,(जिमाका) दि.21 : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,गडचिरोली यांचे वतीने दिनांक 20 नोव्हेंबर 2022 रोजी रस्ते अपघातात बळी पडलेल्यांसाठी जागतिक स्मृती दिन साजरा करण्यात आलेला होता.त्यानिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.

      दिनांक 20 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 8.00 वाजता रस्ता सुरक्षाविषयक मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी कार्यालयातील सहा. मोटार वाहन निरीक्षक पी.डी.येवले यांनी जनतेला रस्ता सुरक्षेविषयक माहिती दिली.सकाळी 10.00 वाजता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली येथे रस्ता सुरक्षेविषयक शपथ घेण्यात आली. सदर कार्यक्रमास कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी तसेच इतर शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सकाळी 11.30 वाजता एस.टी.आगार येथे रस्ता सुरक्षा मार्गदर्शनपर कार्यक्रम तसेच रस्ता सुरक्षा विषयक शपथ घेण्यात आली. 

   यावेळी एस.टी. आगारातील कर्मचारी व अधिकारी तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने सहा. मोटार वाहन निरीक्षक उपस्थित होते. दुपारी 12.00 वाजता टॅक्सी चालक संघटनेकरीता रस्ता सुरक्षा मार्गदर्शन करण्यात येऊन सर्व वाहन चालकांना रस्ता सुरक्षेची शपथ देण्यात आली.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News