ऋषी सहारे
संपादक
आरमोरी-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय आरमोरी येथे दिनांक 18/11/2022 रोज शुक्रवारला बाहेरगाव वरून ये- जा करणाऱ्या परंतु बस ची सोय नसणाऱ्या विद्यालयातील पात्र 22 मुलींना मानव विकास मिशन अंतर्गत सायकलोचे वितरण शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष मदनजी मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी त्यांनी विद्यार्थीनीना शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन उच्च दर्जाचे शिक्षण प्राप्त करावे व आत्मनिर्भर होऊन देश सेवा करावी असा मोलाचा उपदेश केली. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक व्ही. जी. शेंडे सर, पर्यवेक्षक आर. एम. नेताम सर. प्रसिद्धी प्रमुख बडोले सर, मेश्राम सर तसेच इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.