“जगाला प्रेम अर्पावे” हाच आजचा एकमेव मानव धर्म… — दर्यापूर येथील सर्व धर्म समभाव संमेलनातील सर्व धर्म गुरुचा एकमुखी संदेश… 

युवराज डोंगरे /खल्लार 

          उपसंपादक

           पृथ्वी वर राहणाऱ्या सर्वांच्या रक्ताचा रंग एक सारखा लाल आहे म्हणून परमेश्वर आपल्या रंगा मध्ये भेदभाव करीत नाही तर आपल्याला समाजामधे भेदभाव करण्याचा काय हक्क आहे असा प्रश्न उपस्थित करुन खुदा, परमात्मा, गॉड हे सर्व एक असून शेवटी सबका मालिक एक है आणि सबका मालिक जरी असेल तर सबका धर्म ही एकच असला पाहिजे तसेच परमेश्वराकडे जाण्याचे विविध धर्मातील रस्ते जरी वेगवेगळे असले तरी अखेर सर्वांना एकाच ठिकाणी जावे लागते धर्म हे तिथे पोहचण्यासाठी मार्ग दर्शन करतात.

           सर्व धर्मांची शिकवण सर्वत्र एक सारखी असुन मानसाने माणसासारखे वागावे हाच खरा आजचा धर्म आहे, आजच्या बदलत्या काळामध्ये आपसात सद्भावण्याचीवाढविण्याची नितांत गरज आहे.अशा आषयाचे विचार विविध धर्मांच्या धर्मगुरुनी दर्यापुर येथे आयोजित सर्व धर्म समभाव संमेलनात बोलताना व्यक्त केले.

              मुंबई येथील धार्मिक सद्भावना मंच शाखा व स्थानिक नागरिक हक्क संरक्षण समितीच्या वतीने हे विदर्भ स्तरीय संमेलन येथील माहेश्वरी मंगल कार्यालयाच्या भव्य सभागृहात आयोजित करण्यात आले होते.

            धार्मिक सद्भावना संमेलनाच्या अध्यक्षस्थानी नागरिक हक्क समिती चे अध्यक्ष तथा प्रचारक धार्मिक सद्भावना व राष्ट्रीय एकात्मता दर्यापुर ऍड संतोष कोल्हे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून धार्मिक सद्भावना मंच मुंबईचे सचिव डॉ.सय्यद रफिक पारनेरकर सेक्रेटरी धार्मिक सद्भावना मंच महाराष्ट्र पारनेर जिल्हा अहमदनगर हे होते.

              प्रारंभी मान्यवरांचे स्वागत झाल्यावर प्राध्यापक अन्वर अहमद खान सर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तसेच धार्मिक सद्भावना मंच च्या महाराष्ट्रातील कार्याचा कार्याची ओळख करून दिली.

              त्यानंतर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष शरद रोहनकर यांनी दर्यापुर शहरात धार्मिक संमेलनाच्या आयोजन मागील भूमिका व असलेली गरज कथन केली‌. 

            जगातील सर्व धर्मांची मानवाला शिकवण ही माणुसकीची शिकवण असून हे मानवतावादी सद्भावना ज्योत समाजात सतत तेवत राहावी या उद्देशाने सर्व धर्म पंथ तथा संप्रदायातील धर्म गुरूंचे व धार्मिक सद्भावना मंच मुंबई महाराष्ट्र च्या वतीने उपरोक्त प्रमाणे धर्म संमेलन आयोजित करण्यात आले होते.

           स्थानिक माहेश्वरी भवन अकोट रोड बनोसा दर्यापुर येथे संपन्न झालेल्या ह्या संमेलनाच्या प्रमुख अतिथी पदी डॉ. सय्यद रफिक पारनेरकर सेक्रेटरी धार्मिक सद्भावना मंच महाराष्ट्र पारनेर जिल्हा अहमदनगर हे होते.

          या सर्व धर्म समभाव संमेलनामध्ये सर्व श्री. संदीप पाल महाराज राष्ट्रीय प्रवचनकार अमरावती, नामानंद मुनी लोणारकर महानुभाव पंथ अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद गोपाल आश्रम बुलढाणा, प्रभाकर महाराज पूर्णा नगर अमरावती, फादर बिशप चर्च खोलापूर अमरावती फादर उमेश चर्च दर्यापूर, भदंत विशाल कीर्ती बोरगाव, हरिदास कडू मेहरबाबा केंद्र दर्यापुर , मुक्ता दीदी सगणे, नीलू दीदी सगणे, सुलभा दिदी,संचालिका प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्र दर्यापूर ,हजरत मौलाना मुक्ती शकीक साहब कासमी (शेकुल हदीस दारूल उलूम सोनोरी जि. अकोला इत्यादी धर्मगुरू विचारवंतांनी आपले आपापल्या धर्माबद्दल राष्ट्रीय एकात्मता या विषयी प्रभावी विचार व्यक्त केले अध्यक्षपदावरून आपले विचार व्यक्त करताना एड. संतोष कोल्हे यांनी आजच्या सामाजिक परिस्थितीवर आपले विचार मांडले आजचे राजकारणी लोक स्वतःच्या स्वार्थासाठी विविध समाजामध्ये दुहीचे दूषित वातावरण तयार करीत आहेत ही खंत सुद्धा त्यांनी बोलताना व्यक्त केली.

            कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन नित नवरे सर      यांनी तर आभार प्रदर्शन मिर्झा जाहेद बेग यांनी केले. संमेलनाच्या यशस्वी ते करिता शरद रोहणकर, नागेश रायबोले,प्रा. अन्वर अहमद खान, पंकज अनासाने, गजानन पाटील साखरे, सुधीर तायडे ,मुरलीधर राय बोर्डे प्रल्हाद गाठेकर आबा पाटील फुके, रुपराव तिडके, रवींद्र खांडेकर आसिफ अयाज, मिर्झा जाहेद बेग यांनी विशेष परिश्रम घेतले.