दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आळंदी देवाची विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी संतोष बबन वीरकर यांची तर व्हा.चेअरमन पदी सिंधुबाई भरत कुऱ्हाडे यांची सोमवारला (दि.२१) रोजी बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती सचिव सचिन कुऱ्हाडे यांनी दिली.
आळंदी देवाची विकास सोसायटीचे मावळते चेअरमन बाबुलाल घुंडरे व्हा.चेअरमन सुभाष सोनवणे यांनी आवर्तन पद्धती नुसार राजीनामा दिल्याने या रिक्त जागी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी सोमवारी दि.२१ रोजी दुपारी १२ वाजता सहकार अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती.
यावेळी चेअरमन पदासाठी संतोष बबन वीरकर व व्हा.चेअरमन पदासाठी सिंधुबाई भरत कुऱ्हाडे निर्धारित वेळेत प्रत्येकी एक एक अर्ज प्राप्त झाल्याने यावेळी त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ मुंगसे, माजी चेअरमन दिलीप मुंगसे, ज्ञानेश्वर घुंडरे, बाबुलाल घुंडरे, संचालक सुभाष सोनवणे, वासुदेव मुंगसे, अरुणा घुंडरे, पांडुरंग रानवडे, सचिव सचिन कुऱ्हाडे आदींसह सभासद समर्थक उपस्थित होते.