तालुक्यातील चंदनखेडा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावतीच्या वतीने शेतमाल खरेदीला सुरुवात…

      उमेश कांबळे

भद्रावती तालुका प्रतिनिधी 

पहिल्या दिवशी 43 सोयाबीनची खरेदी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तालुक्यातील चंदनखेडा येथे उपबाजार आवारात सोमवार दिनांक 21/10/2024 रोजी बाजार समितीचे सभापती भास्कर लटारी ताजणे यांच्या शुभहस्ते शेतमाल खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी 43 क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आली.

         याप्रसंगी बाजार समितीचे संचालक गजानन उताणे, परमेश्वर ताजणे, श्यामदेव कापटे, भानुदास गायकवाड, शरद जांभुळकर, मनोहर आगलावे, कान्होबा तिखट, राजू आसुटकर सौ. शांताबाई रासेकर, तसेच बाजार समितीचे सचिव नागेश पुनवटकर यांच्यासह व्यापारी मे. नितेश ट्रेडिंग कंपनीचे संचालक नितेश तेला व स्थानिक शेतकरी लटारी रासेकर व मुधोलीचे सरपंच बंडू पा. नन्नावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

        मान्यवरांच्या शुभहस्ते शाल व श्रीफळ देऊन पहिल्या दिवशी सोयाबीन विक्रीसाठी आलेले शेतकरी हरिचंद्र रोडे कांन्सा व रविंद्र मेश्राम शेगाव (खुर्द) यांचा सत्कार करण्यात आला.

          कार्यक्रम आयोजनासाठी बाजार समितीचे कर्मचारी विठ्ठल टोंगे, विलास पालकर, राजपाल भागवत, हनुमान मगरे तसेच मापारी ईश्वर पोईनकर , किशोर पोईनकर अनिकेत सरोदे यांनी सहकार्य केले.

          शेतमाल विक्रीस आणण्याचे आवाहन चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपआपला शेतमाल (सोयाबीन ,धान, तुरी,चना इत्यादी) भद्रावती तालुक्यातील उपबाजार आवार चंदनखेडा येथे विक्रीस आणावा. असे संयुक्त आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावतीचे सभापती भास्कर ल. ताजने उपसभापती सौ. अश्लेषा म. भोयर (जीवतोडे) आणि सचिव नागेश पुनवटकर यांनी केले आहे.