ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली जिल्हातंर्गत कुरखेडा तालुक्यातील मौजा ढुशी या गावातील शेतशिवारात गवत कापण्या करिता गेलेल्या महिलेवर जंगली प्राण्यांने अचानक हल्ला करुन ठार केल्याची माहीती पुढे आली आहे.
हल्यातील मृतक महिलेचे नाव सायत्रा अंतराम बोगा असे आहे.मृतक महिला मौजा धुशि,ता.कुरखेडा येथील रहिवासी आहे.मृतक महिलेच्या संबंधाने घटनेची माहीती मीळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन मोका चौकशी केली व चौकशी नंतर पंचनामा केला असल्याची माहिती आहे.
मौजा धूशी येथील शेत शिवारात गवत कापणीच्या कामाकरता सदर महिला गेली असताना कक्ष क्र.२७८ वनपरिक्षेत्र देलनवाडी राऊंड सोन्सरी येथील जंगल परिसरात लपुन बसलेल्या हिंस्त्र प्राण्याने महीलेवर अचानक हल्ला करुन ठार केले.पशू हल्ला घटना आज सकाळी दहा ते साडेदहा वाजताच्या सुमारास घडली असल्याचा अंदाज आहे.
आजच्या प्राणी हल्ला घटनेमुळे परिसरातील जनतेमधे भीतीचे वातावरण पसरले असल्याची जनमानसात चर्चा आहे.याचबरोबर हिस्त्र प्राण्याच्या भितीमुळे शेतीचे काम करायची कशी असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे.वनविभाग हिस्त्र प्राण्याच्या बाबतीत काय भुमिका घेतोय याबाबत सध्या संभ्रमावस्था आहे.
मात्र,जनतेची सुरक्षा महत्वाची नाही काय?हा वनविभागाला प्रश्न…