रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
चिमूर:-
नागपूर विभागात सर्वोत्कृष्ट सादरीकरण करून चिमूर येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळेच्या विद्यार्थीनींनी राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प 2023-24 या कार्यक्रमांतर्गत नागपूर विभागीय स्तरावर इंटरनेटचा सुरक्षित वापर व साक्षरता मीडिया या विषयावर उत्कृष्ट भूमिका अभिनय सादर करुन नागपूर विभागात प्रथम क्रमांक पटकावला असल्यामूळे त्यांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली.
सदर विभागीय स्पर्धा ही गुरुवारला राज्य विज्ञान शिक्षण संस्था, (प्रादेशिक विद्या प्राधिकरण) रवीनगर,नागपूर येथे पार पडली.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक प्राचार्य डॉ.हर्षलता बुराडे,जेष्ठ अधिव्याख्याता डॉ. राजकुमार अवसरे,डॉ.गंगाधर वाळले,बुरघाटे,अधिव्याख्याता विभागप्रमुख डॉ.अपर्णा शंखदरबार,परीक्षक सीमा गोडबोले व सूचना भावसार आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान शमिका अभिनय सादरीकरणात प्रथम क्रमांक पटकविनाऱ्या चिमूर येथील अनुसुचित जाती व नवबौद्ध मुलींच्या शासकीय निवासी शाळेच्या विद्यार्थिनींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिल्ड व प्रमाणपत्र देन्यात आले.
तालुक्यात ही शाळा विविध उपक्रम राबवित असुन अनेक स्पर्धामध्ये सहभागी होत असते.नागपूर विभागातील एकुण सहा जिल्ह्यातील विद्यार्थी भूमिका अभिनय सादरीकरनासाठी सहभागी झाले होते.त्यापैकी चिमूर येथील निवासी शाळेने नागपूर विभागात प्रथम क्रमांक मिळविला.
या भूमिका अभिनय स्पर्धेत सहभागी विद्यार्थीनी विभा गव्हारे,क्षिप्रा खोब्रागडे,आकांक्षा रामटेके,समृद्धी नागदेवते,खुशबू रामटेके यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका आणि मार्गदर्शिका सुनिता खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात व सहायक शिक्षक विनय खापर्डे यांच्या उपस्थित सादरीकरण केले होते.
नागपूर विभागात मोठी भरारी मारुन राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाल्यामुळे सहायक आयुक्त समाज कल्यान चंद्रपूर बाबासाहेब देशमुख,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूरचे प्राचार्य हिवारे,जि.प. माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण,गटशिक्षणाधिकारी कांबळे,पंचायत समितीचे केंद्रप्रमुख महल्ले,सर्व पदाधिकारी आणि साधन व्यक्ती यांनी यांनी शाळेच्या मुख्याध्यापक,शिक्षक व सहभागी विदयार्थीनींचे अभिनंदन केले.
सदर स्पर्धेसाठी शाळेतील सर्व सहकारी वृंद सतीश कुकडे,मनोहर गभने, अनुराधा महाजन,हेमुताई मगरे,धात्रक, आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यीनींनी मेहनत घेतली होती.