सावली: (सुधाकर दुधे)
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मध्ये इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या सर्वांगीण विकासाच्या योजना राबवितांना बार्टीच्या धर्तीवर ओबीसींच्या संस्थांना प्राध्यान्य देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका अध्यक्ष कवींद्र रोहनकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री, ओबीसी विभागाचे सचिव यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गच्या सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेचा उद्देश मागास असलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीकोनातून या संस्थेची स्थापना झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी च्या२८ ऑक्टोबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्हावार प्रशिक्षण केंद्र उभारून प्रशिक्षण देण्याचे काम करावे व ते प्रशिक्षण केंद्र निवड करतांना अनुसूचित जाती प्रवर्गातीलच प्रशिक्षण संस्थाना, केंद्रांना या निवडीमध्ये प्राध्यान्य देण्याचे धोरण ठरविले आहे. तरी महाज्योती संस्थेने सुद्धा बार्टी च्या धर्तीवर निर्णय घेवून प्रशिक्षण केंद्र ठरवित असतांना ओबीसी, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाला प्राध्यान्य देण्याचा निर्णय घेवून तसा शासन निर्णय निर्गमित करावे. यामध्ये अन्य कोणत्याही संस्थाना प्राध्यान्य देवू नये अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री, ओबीसी विभागाचे सचिव यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले त्या वेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघ सावली चे अध्यक्ष कविंद्र रोहणकर, अर्जुन भोयर, गिरीश चिमुरकर, धनराज डबले, किशोर घोटेकर, अंकुश भोपये, किशोर वाकुडकर, श्रावण बर्लावार, संतोष मेडेवार,शरद ठुसे, दिलिप आभारे, पुंडलिक शेरकी, प्रदिप कुकडकर, तुळशीदास भुरसे, उपस्थित होते