प्रतिनिधी//प्रलय सहारे
वैरागड : – येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (मोठा मोहल्ला) येथे अनेक दिवसापासून ८३८५५१/०१/HP-०३ हातपंप बंद असून आणि चार दिवसापासून नळ पाणी पुरवठा बंद असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
जवळपास वीस दिवसापासून बौद्ध विहार समोर असलेला हातपंप नादुरुस्त होऊन बंद पडलेला आहे. याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायत येथे माहिती दिली. ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी हातपंपची पाहणी करून नागरिकांना लवकर दुरुस्त करून देण्यात येण्याची हमी दिली. परंतु अजून पावेतो हातपंप दुरुस्त करण्यात आला नाही. हातपंप नादुरुस्त आणि वॉर्डांत चार दिवसापासून नळाचे पाणी पुरवठा बंद असल्याने नागरिकांना मिळेल तिथे जाऊन पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावे लागत आहे.
हातपंप आणि नळ पाणी पुरवठा बंद असल्याने आंबेडकर वॉर्डातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी जवळच असलेल्या वैलोचाना नदीवर खड्डा खोदून पाणी आणावे लागत आहे.
याकडे स्थानिक शासन आणि प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन हातपंप दुरुस्त करावे आणि नळ पाणी पुरवठा सुरू करण्यात यावे अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्डातील नागरिक करीत आहे.