निरा नरसिंहपुर दिनांक 20
प्रतिनिधी बाळासाहेब सुतार
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे यांच्या हस्ते पिंपरी गावांमध्ये वृक्ष लागवड करण्याचा शुभारंभ करण्यात आला,
वृक्ष लागवडीच्या शुभार प्रसंगी श्रीराज भरणे बोलत आसताना म्हणाले की कैलासवासी लोकनेते महादेवराव बोडके दादा यांचे आमच्या मामांवर मोठे प्रेम व आशीर्वादा नेहमीच पाठीशी होता. मामांना तालुक्यामध्ये राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामची ओळख करून देण्याची मोठी कामगिरी कैलासवासी बोडके दादांच्या माध्यमातून झाली. दादांचा आशीर्वाद पाठीशी आसल्यामुळे म्हणूनच आमचे भरणे कुटुंब पिंपरी बुद्रुक गावचा कधीच विसर पडू देणार नाही.
श्रीराज भरणे यांचे यावेळी उद्गार.
माजी आदर्श सरपंच श्रीकांत बोडके यांच्या स्वखर्चाने पिंपरी बुद्रुक परिसरातील सर्व भागांमध्ये हजारो वृक्ष लागवड करण्याचा शुभारंभ श्रीराज भरणे यांच्या हस्ते करण्यात आला.२) लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालय, जिल्हा परिषद शाळा, आंगणवाडी शाळा परिसर, लक्ष्मीबाई मंदिर, जिल्हा बँक, नरसिंह मंदिर, महादेव मंदिर, पीरसाहेब मंदिर, समाज मंदिर, दफन भूमी, स्मशानभूमी, आरोग्य केंद्र, तलाठी कार्यालय, शिवस्मारक, नरसोबा मंदिर, आशा सर्व गावातील भागामध्ये वृक्ष लागवड करण्यात आली. या कार्यक्रमा प्रसंगी उपाध्यक्ष सुरेश शिंदे, नागेश गायकवाड, माजी सरपंच श्रीकांत बोडके, नामदेव बोडके, आशोक बोडके, गावचे विद्यमान सरपंच ज्योती श्रीकांत बोडके, उप सरपंच पांडुरंग बोडके, ग्रामपंचायत सदस्य संतोष सुतार, माजी चेअरमन सुदर्शन बोडके व विद्यालयातील शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.