चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
साकोली:- येथील परेड ग्राऊंड येथे कोजागिरी निमित्त चर्चा बैठक संपन्न झाली. या वेळी प्रभागातील पुरुष तथा महिला मंडळी सोबत चर्चा करण्यात आली व नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या.
या वेळी प्रमुख उपस्थितीत मा.प्रकाशजी बाळबुध्धे जिल्हा उपाध्यक्ष भाजप, बाळा काशिवार माजी आमदार, धनवंता राउत, निशाताई ईसापुरे, लखन बर्वे, गोमासे सर,किशोर पोगडे, पी एम कोटांगले, महादेव कापगते ,मनीष कापगते, सपन कापगते , जगनजी उईके,अरुण बडोले,रमेशजी मुंगुलमारे, देवनाथ रहांगडाले, ललित खराबे,रवी पर्शुरामकर,अशिक गणवीर, नईम अली,सोमलवारजी,पराग टेंभुने,राजेश गणवीर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी महिलांना बचत गटाविषयी पुरेपूर माहिती देऊन व्यावसायाभिमुख मार्गदर्शन केले .महिलांनी बचत गटा तर्फे लघु उद्योग सलग्न असलेल्या व्यवसाय सुरू करावे व यासाठी लागणारी मदत वा मार्गदर्शन देण्यासाठी तत्पर राहू असे प्रकाशजी बाळबुध्धे यांनी चर्चा बैठकीत म्हणाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशिक गणवीर,किशोर पोगडे यांनी अथक प्रयत्न केले.