बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे सालाबाद प्रमाणे मुस्लिम धर्मामध्ये ईद-ए-मिलाद हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
या जयंती निमित्त माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे मामा यांनी भेट देऊन मज्जिद मध्ये जाऊन दर्ग्यावर चादर चढवून नतमस्तक होऊन दर्शनाचा लाभ घेऊन आशीर्वाद घेतला.सर्व मुस्लिम बांधवांन शुभेच्छा दिल्या.
मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त दत्तात्रय भरणे बोलत आसताना म्हणाले की,माझ्या गोरगरीब मुस्लिम समाजासाठी वाटल तेवढा मोठा निधी देऊन समाजाचा चौफेर विकास केला जाईल. तसेच येणाऱ्या सर्व अडचणीला मी मदत करेनच. एकही माता भगिनी लाडकी बहिणी या योजनेतून राहू दिली जाणार नाही प्रत्येक महिलेला लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळवून दिला जाईल.मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त पिंपरी बुद्रुक येथे आमदार दत्तात्रय भरणे यांचे उद्गार.
इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त ईद ए मीलाद निमित्त जल्लोषाचे आयोजन केले. संपूर्ण पिंपरी गावामध्ये ग्राम प्रदक्षिणा वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यानिमित्त शेकडो मुस्लिम समाज तरुण बांधव एकत्र येऊन या सणाचा मोठा आनंद घेतला.
या निमित्त प्रमुख उपस्थिती माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे. साखर कारखान्याचे संचालक श्रीकांत बोडके सरपंच प्रतिनिधी सुदर्शन बोडके सरपंच भाग्यश्री बोडके उपसरपंच संतोष सुतार माजी सरपंच पांडूरंग बोडके, पोलीस पाटील वर्धमान बोडके, बबनदादा बोडके, प्रभाकर बोडके, बाळासाहेब घाडगे, नामदेव बोडके, महेश बोडके, प्रवीण बोडके, रामभाऊ लावंड तय्यब शेख, दादाभाई शेख, नबीलाल शेख, सिकंदर शेख, खुद बुद्धीनं शेख, रमजान शेख , ताजुद्दीन शेख, पापा शेख, महबूब शेख, बाळू शेख, सुलतान शेख, सह इतर समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.