गाजी-ए-मिल्लत सुफी हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी बाबा यांच्या ३१ व्या उरुस निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन…

 बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी 

          लुमेवाडी तालुका इंदापूर येथे सालाबाद प्रमाणे होणारा उरूस हा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे यासाठी हजारो भाविक व भक्तांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे.

          गा-ए- मिल्लत सुफी हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी बाबा (रहे.) मुसलमानबाडी, (लुमेवाडी, ता. इंदापूर) यांच्या ३१ व्या उरुस निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

           मंगळवार दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ९ वाजता हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपूरी यांच्या मजारवर (समाधी) संदल चढवण्याचा कार्यक्रम होणार आहे.

        बुधवार दि.२५ सप्टेंबर लुमेवाडी येथील सुफी संत हाजी हाफीज फतेह मोहंमद जोधपूरी यांचा दर्गाह रोजी मुख्य उरुस साजरा होणार आहे.

           त्यानिमित्त राज्यासह राजस्थान, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथील भाविक दर्शनासाठी उपस्थिती लावतात. तसेच सायंकाळी आठ वाजता उस्ताद चाँद कादरी यांचे शिष्य छोटे चाँद कादरी (इंदौर) व छोटे मजिद शोला यांचे भाऊ व शिष्य युसुफ शोला (नागपूर) यांच्यात कव्वाली चा शानदार गुरुवार (दि. २६ सप्टेंबर) रोजी सकाळी आठ वाजता जियारत निमीत्त जर्दाचे वाटप करून ऊरूस संपन्न होणार आहे.

            हजरत सूफी वली चाँद पाशा (आवाटी), हजरत सूफी अरीफबाबा (मोमिनाबाद), हजरत यादअली साहब (छोटे बाबजी राजस्थान), सज्जादा नशीन सूफी हसनैन कादरी (आवाटी शरीफ) यांच्या देखरेख व मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न होणार आहे. तसेच उरुस निमित्त अकलुज मिरवणूक काढण्यात येणार आहे.

           सादीकभाई उर्फ अदीशाह दर्गा डेकोरेशन लायटिंग विजापूर तसेच आबा सरगर ऑडीओ लॉली साऊंड सिस्टिम, कन्हेर- इस्लामपूर यांचे दर्गाहवरती डेकोरेशनचे विशेष सहकार्य लाभणार आहे. दर्गाह ट्रस्टी सुफी हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपूरी बाबा (रहे.) दर्गाह कमिटी, मुस्लीम जमात व ग्रामपंचायत लुमेवाडी यांनी नियोजन केले आहे.