जिल्हा परिषद शाळेत मुलांना गणवेश वितरण…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

साकोली : शासनाच्या मोफत गणवेश अभियानाला उशिरा का होईना पण शासकीय यंत्रणेने गणवेश पुरवठा सुरू केला आहे. येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथ. शाळा क्र. १ गणेश वार्ड साकोलीत शनिवार २१ सप्टेंबरला शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षकवृंद यांच्या हस्ते इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. 

          जिल्हा परिषद शासकीय शाळेत गणवेशाचा पत्ता नाही. एकीकडे शासन खाजगी इंग्लिश शाळेची वर्षभरांची शुल्क शासन भरते पण शासकीय जिल्हा परिषद शाळांमध्ये गणवेशात दिरंगाई का.? हे वृत्त ०४ ऑगस्ट २०२४ ला “खाजगींना निधी देता मग आम्हाला गणवेश का नाही” या मथळ्याखाली प्रकाशितही केली होती.

           शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथ. शाळा क्र. १ येथे शालेय गणवेश वितरण करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक डी. डी. वलथरे, सहाय्यक शिक्षक एम. व्ही. बोकडे शिक्षिका शालिनी राऊत, चित्ररेखा इंगळे, श्रद्धा औटी, चेतन बोरकर, टी. आय. पटले, आरती कापगते यांसह शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हेमंत भारद्वाज, उपाध्यक्ष हिमा राऊत, भागवत लांजेवार, पूनम मेश्राम, आशिष चेडगे, शिशुपाल क-हाडे, दिलीप झोडे, वैशाली कापगते, दिपाली राऊत, रीता शहारे, अमित लांजेवार हे उपस्थित होते.