ऋषी सहारे
संपादक
आरमोरी :- येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून सदर उत्सवाच्या दरम्यान आरमोरी शहरांमध्ये सर्व शारदा व दुर्गा उत्सव मंडळाने जातीय सलोखा निर्माण करून दुर्गा व शारदा उत्सव उत्साहात संपन्न करावा.असे आवाहन आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास गवते यांनी आज दिनांक 21 सप्टेंबर रोजी केले ते आरमोरी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या दुर्गा उत्सव व शारदा उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.
सदर बैठकीला मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक कैलास गवते म्हणाले सर्व दुर्गा उत्सव आणि शारदा उत्सव यादरम्यान आपल्या मंडळातच्या देवीची मूर्ती आणि तसेच झाकी पाहण्यासाठी अनेक लोक बाहेर गाव वरून येत असतात.
यामध्ये बऱ्याच प्रमाणात गर्दी असतें यामध्ये पाकिट मार असतात अशावेळी मंडळाच्या वतीने सदर स्टेज च्या जवळ सभोवताल सीसीटीव्ही कॅमेरे लावावी असे आवाहन तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बाहेरून येणारे सर्व प्रतिष्ठित मान्यवर मंडळी तसेच गस्तीपथक या सर्वांना चहाची आणि पाण्याची व्यवस्था करावी तसेच मंडळाच्या चारही बाजूने लाईटची व्यवस्था करण्यात यावी.
त्याचप्रमाणे परवानगी काढणे ही ही मुदत 25 सप्टेंबर पर्यंत असून जास्तीत जास्त लोकांनी ऑनलाईन परमिशन काढावी असे आवाहनही पोलीस निरीक्षक गवते यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना केले.
यावेळी मंडळाच्या सुद्धा पदाधिकाऱ्यांनी ठाणेदार कैलास गवते यांना आरमोरी येथील परंपरा अनेक दिवसापासून सुरू असून नवरात्र उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो आणि याची ख्याती संपूर्ण विदर्भात असल्याने नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याच प्रकारचे मांसाहार केल्या जात नाही.
मटन मार्केट आणि मच्छी मार्केट सुद्धा ह्या नऊ दिवसात पूर्णतः बंद असते नवदुर्गा उत्सव मंडळ बस स्टॅन्ड सार्वजनिक दुर्गा मंदिर टिळक चौक आरमोरी बाल शारदा उत्सव मंडळ सुभाष चौक आणि इतरही आरमोरी येथील मोठे उत्सवाचे मंडळ आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच ग्रामीण भागातील सुद्धा दुर्गा व शारदा उत्सव मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या सभेला आरमोरी येथील माजी आमदार हरीरामजी वरखडे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
या सभेच्या दरम्यान आरमोरी येथील पोलीस उपपोलीस निरीक्षक विजय चव्हाण, सुरज अनपड, कोडापे, दिलीप मोहुर्ले आरमोरी येथील होमगार्ड चे प्रभारी अधिकारी अनिल सोमनकर पोलीस उपनिरीक्षक संतोष कडाळे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.
सदर सभेचे संचालन आणि संपूर्ण मंडळ यांना माहिती अशोक ठाकरे गोपनिय शाखेचे हवालदार यांनी केले तर आभार पोलीस उपनिरीक्षक संतोष कडाळे यांनी मानले या सभेच्या यशस्वी केले त्यासाठी आरमोरी तालुक्यातून आलेले सर्व शारदा दुर्गा उत्सव मंडळी मंडळाचे पदाधिकारी व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.