वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालयात कौशल्य केंद्राचे उद्घाटन…

ऋग्वेद येवले 

  उपसंपादक

दखल न्युज भारत

साकोली :- येथे वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन शुक्रवार दि. 20 सप्टेंबर, 2024 रोजी दु. 12.30 वा. प्रधानमंत्री महोदय यांच्या हस्ते वर्चुअल/ऑंनलाईन पद्धतीने वर्धा येथून भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालय, साकोली येथे मंजूर “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे” उद्घाटन करण्यात आले. 

            राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 मधील व्यवसायिक शिक्षणाचे महत्व ओळखून कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक फायदा राज्यातील युवक युवतींना व्हावा.राज्यातील 1000 नामांकित महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करून महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या मंत्री, कौशल्य, रोजगार व नाविन्यता यांचा मानस आहे.

            उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सोमदत्त करंजेकर, अध्यक्ष वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था नागपूर, डॉ. हेमकृष्ण कापगते, माजी आमदार साकोली, डॉ. लोकानंद नवखरे, प्राचार्य/मुख्याध्यापक नवजीवन विद्यालय साकोली, श्री. हेमकृष्ण वाडीभस्मे सामाजिक कार्यकर्ता, श्री. नितीन खेडीकर सामाजिक कार्यकर्ता, डॉ. सुनील चतुर्वेदी, प्राचार्य वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालय साकोली, डॉ. जितेंद्रकुमार ठाकूर , अशोक कुमार मीना, पुखराज लांजेवार, शाहीद सय्यद, दिव्या कुंभारे व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आणि 310 विद्यार्थी उपस्थित होते.