भाविक करमनकर
धानोरा प्रतिनिधी
धानोरा तालुक्यातील बेलगाव ते पन्नेमारा हा मार्ग पूर्णपणे उखडलेला आहे त्यामुळे जाणे येणे करणाऱ्या प्रवाशांना व नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वाहनधारकांना आपले दुचाकी वाहन काढत असताना एखाद्या वेळेस दगडावरून जर गाडी गेली असत्या गाडीचे नियंत्रण जाऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रस्त्याची गिट्टी पूर्णपणे निघालेली आहे, तसेच या रस्त्याने छत्तीसगड ला जोडणारा रस्ता असल्याने या रस्त्याचा वापर करतात याच रस्त्याने जातात.त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे खराब झाला असून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी असे नागरिकांनी मागणी केली आहे.