युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
दर्यापूर तालुक्यात बहुतांश गावात मागील वर्षी अतोनात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे दर्यापूर तालुक्यातील शेतकरी हे हवालदिल झालेले असून यावर्षी सुद्धा पिकांची परिस्थिती दयनीय आहे.
मागील वर्षाच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर केलेले असून सुद्धा दर्यापूर तालुक्यातील काही महसूल अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळण्यास विलंब होत आहे.
याबाबत युवासेने तर्फे वारंवार निवेदन देऊन सुद्धा या प्रकारची कुठलीही दखल घेतल्या गेली नाही तरी तात्काळ सात दिवसाच्या आत दर्यापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात विना विलंब अनुदानाचे पैसे जमा करावेअन्यथा युवा सैनिक दर्यापूर तालुक्यातील प्रत्येक तलाठी कार्यालयात युवासेनेच्या पद्धतीने आंदोलन युवासेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा युवासेना दर्यापूर विधानसभा समन्वयक प्रतिक राऊत यांनी दर्यापूरच्या तहसिलदारांना निवेदना द्वारे दिला असून सदर निवेदनाची तहसिलदार यांनी दखल घ्यावी अन्यथा युवासेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल व त्याची सर्व जबाबदारी शासनाची राहील असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.