ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली, : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली यांचे आदेशान्वये व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील न्यायालयात दिनांक ०९ सप्टेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात आपसी तडजोडीतून २५७ प्रलंबित व २०६ दाखल पूर्व खटले निकाली काढण्यात आले.
सदर अदालतीमध्ये तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, १३८ एन. आय. अॅक्ट प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बँकेशी संबंधीत प्रकरणे तसेच वाद दाखलपूर्व प्रकरणांमध्ये टेलीफोन, मोबाईल कंपनी संबंधीत वाद, महाराष्ट्र राज्य वीज वितरण प्रकरणे, पतसंस्थेशी संबंधीत प्रकरणे, ग्रामपंचायत, नगर परिषद अंतर्गत कर आकारणीचे प्रकरणे तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथील प्रकरणे इत्यादी असे २५७ प्रलंबित आणि २०६ दाखलपूर्व खटले आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले.
तसेच लोक अदालतीच्या माध्यमातून ४ कोटी १५ लक्ष १६ हजार १७५ रुपये वसुल करण्यात आले. किरकोळ स्वरुपाच्या मामल्यांकरीता स्पशेल ड्रायव्हरद्वारे एकूण ११४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. वैवाहिक वादाच्या एका प्रकरणात पती – पत्नी यांचा समझोता होवून पत्नी नांदायला गेल्याने अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, गडचिरोली यु.बी. शुक्ल यांनी उभयतांचा साडी-चोळी व शेला देवून सत्कार केला.
अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, गडचिरोली, यु.बी. शुक्ल व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली, आर. आर. पाटील यांचे देखरेखीखाली लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा न्यायाधिश – १ तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश, गडचिरोली यु. एम. मुधोळकर यांनी पॅनल क्र. ०१ वर काम पाहिले, पॅनल क्र. ०२ वर दिवाणी न्यायाधिश (व.स्तर) तथा मुख्यन्यायदंडाधिकारी, गडचिरोली एस.पी. सदाफळे, तर पॅनल क्रं. ०३ वर सह दिवाणी न्यायाधिश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्र.श्रे.), गडचिरोली, सी.पी. रघुवंशी यांनी काम पाहिले. दिनांक ०९.०९.२०२३ रोजी कार्यालयीन कामकाज दिवस घोषित करुन किरकोळ गुन्ह्याचे खटले फौ.प्र. सं. कलम २५६,२५८ अन्वये तसेच गुन्हा कबुलीद्वारे निकाली काढण्याकरीता तृतिय सहदिवाणी न्यायाधिश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्र.श्रे.), गडचिरोली, श्रीमती एन.सी.सोरते यांचे न्यायालय कार्यरत होते.
तसेच पॅनल क्रमांक ०१ मध्ये पॅनल सदस्य म्हणून विधी स्वयंसेवक, गडचिरोली, अमोल किरमीजवार, पॅनल क्रमांक ०२ मध्ये पॅनल सदस्य म्हणून विधी स्वयंसेवक लुकेश सोमनकर आणि पॅनल क्रमांक ०३ मध्ये पॅनल सदस्य म्हणून विधी स्वयंसेवक, प्रविण घाटे यांनी काम केले.
सदर लोकन्यायालय यशस्वी करण्याकरीता गडचिरोली जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष रविंद्र दोनाडकर तसेच जिल्हा वकील संघाचे जेष्ठ अधिवक्ता आणि इतर वकील वृंद व न्यायालयीन कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीचे पी.व्ही.संतोषवार, अधिक्षक, एन. आर. भलमे, वरिष्ठ लिपिक, तसेच कनिष्ठ लिपिक एन. डी. गुरनूले, एस.के. चुधरी, जे. एम. भोयर, एच. एम. गायमुखे, एस. एन. आळे, व एस.डब्ल्यु. वासेकर, शिपाई यांनी अथक परिश्रम घेतले असे अधिक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांनी कळविले आहे.