दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे विभागीय
आळंदी : पश्चिम विदर्भातील त्यातल्या त्यात बुलढाणा, अकोला जिल्ह्यातील वेगळेपण आणि वैशिष्ट्य म्हणजे मिरचीची किंवा मिरच्यांची भाजी होय ! ही भाजी खानदेशात सुद्धा बनवली जाते. या मिरचीच्या भाजीचा बेत आळंदी येथील विदर्भवासी असलेले पण आळंदीत स्थायिक झालेले विठ्ठलराव शिंदे यांनी आपल्या मित्र परिवार व आळंदी व केळगाव मधील ग्रामस्थांसाठी मिरचीच्या भाजीच्या जेवणाचा अनोखा बेत आखला होता. यावेळी अनेकांनी या भाजीवर प्रथमच ताव मारला.
यावेळी आळंदी आणि परीसरातील नागरिकांना या अनोख्या पद्धतीने बनविलेल्या मिरचीच्या भाजीचे जेवणाचा बेत मिळवा त्यांना सुध्दा विदर्भातील हा आवडीचा बेत नागरिकांना खाऊ घालावा हा बेत आवडेल का नाही याची साशंकता होती पण प्रत्येकांना हा बेत आवडल्याचे यावेळी विठ्ठलराव शिंदे यांनी सांगितले.
विदर्भातील खाद्यसंस्कृती ज्या पदार्थाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही असा पदार्थ म्हणजे मिरचीची भाजी. आता कुणाला वाटेल मिरच्या म्हणजे सिमला मिरच्या. पण नाही, या मिरच्या म्हणजे अस्सल, ताज्या हिरव्या मिरच्या. खरं तर हा पातळ भाजीचा किंवा आमटीचा प्रकार आहे. अतिशय झणझणीत पण अतिशय चवदारही. एकदा खाल्लात की परत परत खाल.
ही भाजी मी सगळ्यात पहिल्यांदा खायला मिळाली ती विठ्ठल शिंदे या मित्राच्या घरी. त्यांच्या घरची ती पंगतीत आम्ही सगळे मस्त मांडी घालून खाली जमिनीवर बसलो होतो. समोर ताटात गरमागरम भाकरी, चिरलेलं मुळा, काकडी, टोमॅटो, कांदा, लिंबू बरोबर भात आणि वाटीत मस्त हिरवीगार मिरचीची भाजी खायला मिळाले याचा माझ्या सारख्या खवय्याला आनंद झाला असल्याचे डॉ.सुनील वाघमारे यांनी सांगितले.
बहुतेक लोकांना या भाजीचे नाव अगदी नवखे आणि विचित्र वाटत असेल..! परंतु मिरचीची भाजी हा पदार्थ अतिशय वेड लावणारा होता असे शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण यांनी यावेळी सांगितले.