आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाचे लाभ घ्यावे – मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीमती आयुषी सिंह

 

ऋषी सहारे

संपादक

गडचिरोली, : आयुष्यमान भव या शासनाच्या अत्यंत महत्वाकांक्षी मोहिम दिनांक १३ सप्टेंबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत आरोग्य मेळावा तालुका भामरागड येथे दिनांक १६ सप्टेंबर २०२३ ला आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी कार्यक्रमाला उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. गडचिरोली, श्रीमती आयुषी सिंह हे होते.

         गेलेली संपत्ती परत येवु शकते, परंतु बिघडलेले आरोग्य परत येवु शकत नाही. करीता सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी. आयुष्यमान भव मोहिमे अंतर्गत अरोग्य विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. मधुमेह, रक्तदाब, सिकलसेल तपासणी, माता व बालकांचे आरोग्य, कुष्ठरोग, क्षयरोगाबाबत तपासणी औषधोपचार केला जाणार आहे. तसेच लसीकरण, डोळयाची तपासणी या मोहिमेअंतर्गत करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड, गोल्डन कार्ड, आभा कार्ड ऑनलाईन पद्धतीने काढण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड काढावेत असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. गडचिरोली, आयुषी सिंह यांनी केले.

        जिल्ह्यातील अतिदुर्गम तालुका भामरागड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीमती आयुषी सिंह यांच्या हस्ते आयुष्यमान भव मोहिमेअंतर्गत आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिरोली, राजेन्द्र भुयार, जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली डॉ. दावल साळवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण, श्रीमती इंगोले, डॉ. बागराज धुर्वे, गट विकास अधिकारी, प.स. भामरागड, श्री. मगदुम, तालुका आरोग्य अधिकारी, भामरागड, भुषण चौधरी, वैद्यकीय अधिक्षक ग्रामिण रुग्णालय, भामरागड, डॉ. दिपक कातकडे, तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी हे उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे संचालन आनंद मोडक यांनी केले. असे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.