नवजीवन विद्यालयात बाप्पाचे आगमन…

      ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी

साकोली:

‘गणपती बाप्पा मोरया…… मंगल मूर्ती मोरया’ चा गजर करत नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कूल (सीबीएसई) साकोली येथे गणेश चतुर्थी निमित्त विघ्नहर्ता गणरायाची स्थापना करण्यात आली. श्री गणेशाच्या मुर्तीचे आगमन ढोलताशा व लेझीम च्या गजरात झाले. गणरायाच्या सजावटीसाठी शिक्षक व वर्ग 9 चे विद्यार्थी यांच्या सहकार्याने चंद्रयान ३ देखावा तयार करण्यात आला. श्री गणरायाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व जल्लोषपूर्ण वातावरण निर्माण झाला होता.

           श्रीच्या स्थापना कार्यक्रम सोहळ्यामध्ये नवजीवनचे प्राचार्य  मुज्जमिल सय्यद, मुख्याध्यापक राजीव समरीत, पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास, प्रशासकीय अधिकारी विनोद किरपान, सतिश गोटेफोडे. विन्नुश नेवारे, किशोर बावनकुळे, जयंत खोब्रागडे, अशोक कुमार मीना, श्रीधर खराबे. विशाखा पशिने, दिपा येले व नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कूल (सीबीएसई व स्टेट) चे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.