प्रितम जनबंधु
संपादक
गडचीरोली जिल्यातील आरमोरी यथे नवरात्र उत्सव सोहळा गेल्या अनेक वर्षापासुन नवनवीन मूर्तिमंत प्रतिकृती साकारून आगळावेगळा व मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आरमोरी शहरात नवरात्र उत्सवाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. आरमोरी तालुक्यातील तसेच सभोवतालच्या परीसरातिल भाविक भक्त खुप मोठ्या प्रमाणात आरमोरी शहरात दर्शनासाठी प्रामुख्याने येत असतात. नवरात्री उत्सवानिमित्य मेला, मीनाबाजार भरवला जातो त्यासोबतच ठिकठिकाणी गरबा नृत्याचे आयोजनही केले जाते.
त्याचीच पुर्वतयारी म्हणुन आरमोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ‘राजीव भवन’ येथे नवशिक्या तरुण तरुणीना “गरबा” नृत्याचे पुर्व प्रशिक्षण देन्याचे कार्य अगदीच जोमात सुरु आहे. बाहेरुन येणाऱ्या भाविक भक्तांना विरंगुळा म्हणून गरबा नृत्याचे आयोजन केले जाते. यामुळेच युवक व युवती याच्या नृत्यासोबतच शरीराचा व्यायाम होत असुन त्याच्या अंगी असलेले सुप्त गुण निदर्शनास येण्यास वाव मीडावे या उदात्त हेतूने गरबा प्रशिक्षणाचे धडे गीरवीण्याचे कार्य जोमात सुरु असल्याचे दिसुन येत आहे.