सतिश कडारला

जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली 

 

गडचिरोली, दि.21 : महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवाडानिमित्त बँक कर्ज मेळाव्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्याहस्ते संपन्न झाला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सदर मेळाव्याचे यशस्वी आयोजन गोंडवाना विद्यापीठ परिसरात करण्यात आले होते.

   यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या आवश्यक १४ सेवा आता गतिमान करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, विविध दाखले, योजनांचे अनुदान, शायकीय मदत तसेच फेरफार अशा सेवा आता अर्ज दाखल झाल्यानंतर आठवड्यात मार्गी लागतील यासाठी नियोजन करण्यात आले आहे. बँका, महसूल व जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या सेंवाबाबत काही कारणांस्तव बराच विलंब लागत असल्याचे निदर्शनास आले होते. यातील त्रुटी दूर करून नागरिकांना महाराजस्व अंतर्गत वेळेत सेवा देण्यासाठी परिपत्रक काढण्यात येणार आहे.

राष्ट्रनेता ते राष्ट्रपीता सेवा पंधरवडा अंर्तगत गोंडवाना विद्यापिठ गडचिरोली येथे जिल्हाधिकारी संजय मिणा (भा.प्र.से.) यांच्या संकल्पनेने व तहसिल कार्यालय गडचिरोली यांच्या वतीने महाराजस्व अभियान व कर्ज वितरण मेळावा आयोजीत करण्यात आला होता. महाराजस्व अभियान अंर्तगत महसुल विभाग, पंचायत समिती, कृषी विभाग, भुमी अभिलेख, वनविभाग, आरोग्य विभाग व इतर शासकिय विभागाचे सेवा व सुविधा नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध करून प्रदान करण्यात आल्या. कर्ज वितरण मेळाव्यामध्ये एकुण १४ राष्ट्रीयकृत व खाजगी बँकानी कर्ज देण्याकरिता स्टॉल लावून नागरिकांना गतीशील व सुलभ रितीने कर्ज मागणी प्रकरणाचा निपटारा करण्यात आला.

   महाराजस्व अभियान व कर्ज वितरण मेळाव्याअंतर्गत नागरिकांनी उपलब्ध सेवा सुविधांचा लाभ घेतला. त्यामध्ये बँकांकडील प्रलंबित १०८ प्रकरणांमधून २ कोटी ६२ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. एकुण २३२ उत्पन्न दाखले देण्यात आले, संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजने चे एकुण ६७ पात्र प्रकरणे प्राप्त झाले, कृषी विभागाअंतर्गत एकुण १०६ प्रकरणामध्ये लाभ वाटप करण्यात आले. तसेच समर्पित नक्षल यांना व इतर नागरिकांना मिळून एकुण ३७ रेशन कार्ड चे वितरण करण्यात आले. एकुण २६ नागरिकांची आधार कार्ड ची दुरुस्ती व नविन आधार नोंदणी करण्यात आली, मतदान कार्ड सोबत आधार जोडणीकरिता एकुण १२१ नमुना ६ब प्राप्त झाले. तसेच ३२३ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच कर्ज वितरण मेळाव्या अंतर्गत एकुण ४१ प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. अशा प्रकारे ९५१ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

 

सदर महाराजस्व अभियान व कर्ज वितरण मेळाव्याचे उद्धघाटन संजय मीणा (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या हस्ते पार पडले. सदर कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून राहुल मीणा (भा.प्र.से.) हे लाभले तसेच सदर कार्यक्रमामध्ये युवराज टेभुंणे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, बसवराज मास्तोळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, महेंद्र गणवीर तहसिलदार गडचिरोली, संदिप कराळे प्रकल्प संचालक आत्मा, धनंजय साळवे गट विकास अधिकारी गडचिरोली, प्रदिप वाहने तालुका कृषी अधिकारी गडचिरोली, गजानन भादेश्वर प्रादेशीक व्यवस्थापक विदर्भ कोकण ग्रामीण बँक, विनोद बिटपल्लीवार वैद्यकिय अधिकारी या मान्यवरांनी उपस्थिती लावली. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देवेंद्र दहिकर से.नि. नायब तहसीलदार गडचिरोली यांनी पुर्ण केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com