अश्विन बोदेले
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
आरमोरी /गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात आदिमुत्तापुर या खेड्यामध्ये मोलमजुरी करणारे गरीब, भूमिहीन, दलित श्री मोडी मल्लया पागे हे कुटुंब राहत आहे.
त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी सरकारी पट्ट्याची जमीन नाही. त्यांनी दोन एकरच्या जवळपास अतिक्रमण जमीन काढून त्यात कापसाचे उत्पन्न काढून आपल्या कुटुंबाचा प्रपंच चालवितात. सरकारी पट्टा मिळावा यासाठी 2008 मध्ये वन हक्क समितीकडे प्रस्ताव सादर केला आहे .
नंतर हे प्रकरण दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर गडचिरोली जिल्हा गडचिरोली येथे सुरू असताना, न्यायालयाचे कोणतेही आदेश नसताना, सिरोंचा वनविभागातील कर्मचाऱ्यांनी मुजोरीपणा दाखवीत पागे कुटुंबीयांना अश्लील भाषेत व जातिवाचक शिवीगाळ करून, महिला व पुरुषांना अमानुषपणे बेदम मारहाण केली. व शेतातील कपाशीच्या पिकाची नासधुस केली. आणि त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना चंद्रपूरच्या तुरुंगामध्ये पाठवण्यात आले आहे.
आजही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव काळात दलित समाज सुरक्षित नाही. वारंवार दलितांवर अन्याय अत्याचार होत आहे. व त्यांचा अमानुषपणे छळ केल्या जात आहे.
या सर्व प्रकरणाची चौकशी करून अत्याचार ग्रस्त पागे कुटुंबीयांना न्याय मिळावा. अशी मागणी बहुजन समाज पार्टी च्या वतीने गडचिरोली जिल्हाधिकारी साहेब, पोलीस अधीक्षक, मुख्य वनसंरक्षक गडचिरोली यांच्याकडे निवेदनाद्वारे बसपाच्या शिष्टमंडळाने केली आहे.
यात प्रामुख्याने मा. डी. एस. रामटेके प्रदेश सचिव, मा. प्रदीप खोब्रागडे जिल्हा प्रभारी, मा. शंकर बोरकुट जिल्हाध्यक्ष, मा. गणपत तावाडे जिल्हा प्रभारी, मा अनिल साखरे जिल्हा कोषाध्यक्ष, मा. कृपानंद सोनटक्के आरमोरी विधानसभा अध्यक्ष निवेदन देताना उपस्थित होते.