पारशिवनी– जिल्हा पाणी व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत पारशिवनी तालुका स्तरिय स्वच्छता हीच सेवा प्रचार रथ दौरा अंर्तगत तालुकात दिनांक19 सेव्टेबर ते 22 सेप्टेबर पर्यत तालुकात चार दिवसीय प्रचार रथ स्वच्छता ही सेवा अभियान प्रचार व प्रसिद्धीकरिता पंचायत समिती पारशिवनी मार्फत माहिती शिक्षण व संवाद कार्यक्रमांतर्गत अभियान रथ IEC VAN व्दारे प्रचार प्रसिद्धि करीता सदर प्रचाररथ ला मा. सभापती सौ मीनाताई प्रफुल्ल कावळे यांनी हिरवी झेंडी देऊन शुभारंभ करण्यात आले.
या प्रसंगी . श्री संदीपजी भलावी पंचायत समिती सदस्य,मा.गट विकास अधिकारी सुभाष जाधव , सहा. गट विकास अधिकारी चंद्रकांत देशमुख, कृषी अधिकारी श्रीमती नांदुरकर मँडम, विस्तार अधिकारी लठाड सर, तसेच सर्व अधिकारी,कमर्चारी व समूह समन्वयक उपस्थित होते
यावेळी गट संसाधन केंद्र मार्फत सदर रथाचे महत्व व उपस्थित सर्व अधिकारी व पदाधिकारी यांना समजून सांगण्यात आले व तालुक्यातील 30 गावांमध्ये या स्वच्छता रथा द्वारे स्वच्छतेबाबत मोठ्या प्रमाणात दृक साधनचा वापर करुन प्रचार व प्रसिद्धी व्दारे लोकांमध्ये स्वच्छतेविषयी,प्लास्टिक वापरा संबंधाने,घनकचऱ्याच्या नियोजना संबंधाने तसेच सांडपाण्याच्या नियोजन संदर्भाने मार्गदर्शनपर चित्रफिती द्वारे त्यांच्या मानसिकतेत बदल घडवण्याच्या प्रयत्न यातून करण्यात येईल
कार्यक्रमाचे संचालन मुनेश दुपारे यांनी केले तर आभार देवानंद तुमडाम यांनी मानले