विवेक रामटेके

  बल्लारपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी

कोठारी: गोरगरीब,शेतकरी,मजूर, विद्यार्थ्यांत अप्रतिम प्रतिभा असून त्यांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य मिळत नसल्याने स्पर्धापरिक्षेत यशस्वी होत नाहीत. पुस्तकापलीकडचा अभ्यास करून क्षितिजापलीकडचा दृष्टीकोन बाळगून आपाल्या आवडत्या क्षेत्रात शैक्षणिक भरारी घेत स्पर्धेतील युगात संघर्ष करून शासनाच्या उच्च पदावर नि:स्वार्थ सेवा करून जनतेसाठी कार्य करण्याचे स्वप्न उराशी बाळगण्याचे आवाहन कोठारीत आयोजित व्याखानमालेत प्रा.नितेश कराळे सरांनी केले.

        विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या गावरान शैलीने विद्यार्थी व थोरामोठ्यांच्या हृदयात स्वतंत्र ठसा उमटविणारे ख्यातनाम व्याख्याते प्रा. नितेश कराळे सर यांनी विविध विषयाला हात घालीत तुफान फटकेबाजी करीत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांची समयोचित भाषणे झाली.

          कोठारी येथे माझा गाव कोठारी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तथा मार्गदर्शन मेळावा व व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून फिनिक्स अकॅडमी वर्धा चे संचालक प्रा. नितेश कराळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी नरेश भोवरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश कुंभारे, प्राचार्य – जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय कोठारी, मोरेश्वर लोहे, सरपंच ग्रामपंचायत कोठारी, पाटील मॅडम, सेवानिवृत्त प्राचार्या जनता कनिष्ठ महाविद्यालय गोंडपीपरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदर कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. याचसोबत कु. सलोनी चुनारकर, कु. स्नेहा राजुरकर, कु. प्रणाली रोहणकर, मोहीत पिंपळकर, कु. महेक गेडाम, कु. मानसी थोरात, मयुर बुरेवार या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच वाचनालयासाठी संघर्ष करणाऱ्या कु. नंदीनी पदमगिरीवार व त्यांच्या समूहाचा सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सुरेश रंगारी व प्रास्ताविक,आभार नितीन रायपुरे यांनी केले.

       सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माझा गाव कोठारी या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन रायपूरे, सचिव अनिल विरुटकर, कार्याध्यक्ष विवेक रामटेके, सुरेश रंगारी,अभय बुटले, पियुष लोडलीवार, संतोष लोनगाडगे, परशुराम पिपरे, सचिन रायपूरे, गणेश गिरडकर, गिरीश लोहे, शैलेश बांबोडे, राजु जुनघरे यांनी यथासांग परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी व बोध घेण्यासाठी बल्लारपूर, गोंडपिपरी, पोंभुर्णा तालुक्यातील व कोठारी परिसरातील शेकडो च्या संख्येने विद्यार्थी, पालक व नागरीक उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com