अबोदनगो चव्हाण
काटकुंभ
जिल्हा प्रतिनिधी अमरावती
अमरावती :- चिखलदरा शहरातंर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील प्रिन्स वानखडे या आठ वर्षाच्या बालकाला रात्रो बारा वाजताच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात भर्ती केले.
मात्र,सायंकाळ पाळीत ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांना माहिती देऊनही रात्रभर डॉक्टर आले नसल्याने प्रकृती चिंताजनक झाल्याचा आरोप प्रिन्सचे वडील सचिन वानखडे यांनी केला आहे.याचबरोबर संबंधित डॉक्टरांवर कारवाहीची मागणी केली आहे.
मेळघाटच्या चिखलदरा ग्रामीण रुग्णालयात दररोज गोरगरीब जनता आरोग्य विषयक समस्या घेऊन येत असतात. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी शासकीय रुग्णालय एक प्रकारे मंदिरच असते आणि तिथे काम करणारे डॉक्टर हे त्यांच्यासाठी देवदूत असतात.
मात्र काही डॉक्टरांमुळे आरोग्य सेवा बदनाम होत आहे. याचा प्रत्येय दिनांक १७ आगस्ट २०२४ रोजी ग्रामीण रुग्णालयात दिसून आला.चिखलदरा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरात राहणाऱ्या प्रिन्स वानखडे वय (८) या बालकांची अचानक प्रकृती बिघडल्याने ग्रामीण रुग्णालयात रात्रीचे बारा वाजेच्या सुमारास भर्ती केले.
यावेळी रुग्णालयात आरोग्य सेविका उपलब्ध होत्या.त्यांनीच बालकांवर प्राथमिक उपचार केले.मात्र बालकाचा ताप औषध देऊनही कमी होत नव्हता,याची माहिती डॉक्टरांना देऊनही ड्युटीवर असलेले डॉक्टर रात्रभर रुग्णालयात आले नाही.
ज्यामुळे बालकांची प्रकृती अधिक बिघडली.अश्यातच सकाळी आठ वाजता महिला डॉक्टर प्रकटल्या.त्यांनी बालकांची तपासणी करून बालकाला अचलपूर येथे रेफर केल्याचा आरोप बालकाचे वडील सचिन वानखडे यांनी केला आहे.
रात्रभर माझ्या मुलावर डॉक्टरांकडून उपचार मिळाला नसल्याने माझ्या मुलाची प्रकृती अधिक चिंताजनक झाली.त्यामुळे अश्या कामचुकार डॉक्टरांवर कारवाही करण्याची मागणी सचिन वानखडे यांनी केली आहे.
*****
बाॅक्स..
…….माझ्या मुलाला रात्री बाराच्या सुमारास भर्ती केले त्यावेळी आरोग्य सेविका उपस्थित होत्या.मात्र डॉक्टर गैहजर होते.
आरोग्य सेविकेने औषध दिले मात्र तरीही ताप कमी होत नव्हता याची माहिती डॉक्टरांना दिली. तरीही डॉक्टर रात्रभर रुग्णालयात आले नाही.
ज्यामुळे माझ्या मुलाची प्रकृती अधिक बिघडली.अश्यातच डॉक्टर सकाळी आठ वाजता आले आणि मुलाची तपासणी करून अचलपूरला घेऊन जा म्हणून सांगितले…
सचिन वानखडे,
रुग्ण प्रिन्सचे वडील…
****
बाॅक्स..
जेव्हा त्या रुग्णांला भर्ती केले त्यावेळी मी स्वतःच रुग्णांवर उपचार केले.त्याच्या भर्ती पेपरवर मी स्वतःच लिहले आहे.त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकाला डॉक्टर आणि आरोग्य सेविका यातला फरक समजत नाही..
डॉ. रिंकू जाट
वैद्यकीय अधिकारी,चिखलदरा..
****
बाॅक्स..
रात्रीच्या वेळेस रुग्ण आल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केल्याशिवाय आरोग्य सेविकांनी औषधी देऊ नये,अश्या सूचना दिल्या आहेत.सोबतच डॉक्टरांनीही तपासणी केल्याशिवाय औषधी देण्यास सांगू नये असे सक्त आदेश दिले आहेत.यापुढे जर रुग्ण उपचार कामात हयगय केल्याचे निदर्शनास आले तर निश्चित कारवाही केल्या जाईल..