युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती,जमाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या व क्रिमिलियर संदर्भात दिनांक १ ऑगस्ट रोजी दिलेला निर्णय हा असंवैधानिक व सामाजिक फूट पाडणारा आहे.
तसेच सामाजिक दृष्ट्या अत्यंत घातक ठरणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाचा निषेध व्यक्त करीत आज 21 ऑगस्टला दर्यापूर येथे सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाद्वारे घेतल्या गेलेल्या या मागासवर्गीय विरोधी निर्णयामुळे सामाजिक स्तरावर चिंता व्यक्त करण्यात येत असून प्रचंड असा रोष व्यक्त करण्यात येत आहे.
या घातक निर्णयाच्या संदर्भात योग्य तोडगा काढण्यासाठी संसदीचे विशेष अधिवेशन बोलावून अनुसूचित जाती जमाती आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा,सर्वोच्च न्यायालयाद्वारे घेतल्या गेलेल्या या मागासवर्गीय विरोधी निर्णयामुळे सामाजिक स्तरावर चिंता व्यक्त करण्यात येत असून रोष व्यक्त करण्यात येत आहे.
संसदेने त्वरित अध्यादेश आणून सदर निर्णय रद्द बादल करून भारतीय संविधानाच्या अनुसूची नऊ मध्ये सुधारणा करावी अशी मागणी पुढे आली.
सदरचा निर्णय रद्द करण्याकरिता 21 ऑगस्ट रोज बुधवारला दर्यापूर येथे अनेक सामाजिक व राजकीय पक्षाद्वारे व सर्वपक्षीय पक्षाद्वारे ठरलेल्या भारत बंद मध्ये कळकळीत बंद पाळण्याचे आयोजन केले होते.
यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष (पश्चिम) संजय चौरपगार,नागरी हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष ऍडव्होकेट संतोष कोल्हे,अमरावती जिल्हा परिषदेचे माजी सभापती विष्णूभाऊ कुऱ्हाडे,युवक काँग्रेसचे नितेश वानखडे,दर्यापूर वकील संघाचे अध्यक्ष ऍड.धर्मेंद्र आठवले,ऍड.निशिकांत पाखरे,राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) डॉक्टर अभय गावंडे, बहुजन समाज पार्टीचे ऍड. विद्यासागर वानखडे,भिमशक्ती संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश भटकर,वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष भिमराव कुऱ्हाडे,सामाजिक कार्यकर्ते नितीन गावंडे,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष मनोज तायडे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट ) शहराध्यक्ष अनिल गवई,ऍड.समिर घाणीवाले,ऍड.रियाज,ऍड.मुकुंद नळकांडे,रिपाई(आठवले गट)दर्यापूर तालुका अध्यक्ष हरिदास खडे,वंचित बहुजन आघाडीचे अरुण गवई,सांगळुद ग्रा.पं.चे उपसरपंच शरद आठवले,गौतम आठवले,शिलवंत रायबोले,बंटी आठवले,संदीप इंगळे,इत्यादी पत्रकार मंडळी तसेच हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
भारत बंदला दर्यापूर शहरातील सर्व व्यापारी बंधू यांनी पाठिंबा दिला.सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.यावेळी दर्यापूरचे ठाणेदार सुनिल वानखडे,गुप्तहेर मंगेश फुकट यांनी पोलिस पथकासह चोख बंदोबस्त ठेवला होता.