लोकशाहीत जनता म्हणजे निरागस रांगतं बाळ.. — वैचारिक लेखमाला भाग ५….

    “लोकशाहीच्या चारही आधारस्तंभाचा म्हणजेच ‘निरागस रांगत्या बाळाच्या ‘ सर्वच सांभाळकर्त्या, वडीलधाऱ्या मंडळीचा गेल्या 75 वर्षाचा परामर्ष घेऊया…..

          परवाच्या भाग 4 मध्ये न्याय मंडळाचा थोडक्यात परामर्ष घेतला. आज पत्रकारितेचा ( माध्यमे ) या लोकशाहीच्या चौथ्या पण अदृश्य आधारस्तंभाचा परामर्ष घेऊया. “

         ” लोकशाहीत पत्रकारिता ( माध्यमे ) यांना फार मोलाचे स्थान आहे.पत्रकारिता ( माध्यमे ) या शब्दाच्या व्याख्येत केवळ इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया यांचाच समावेश नसून, अप्रत्यक्षरित्या कवी,लेखक थोडक्यात साहित्यिक , चित्रपटसृष्टी, रंगमंच ( नाटके ), आणि विविध विषयातील ( सामाजिक शास्त्रातील ) तज्ञाचा, विधिज्ञाचा, या क्षेत्रात सर्व काम करणाऱ्यांचा समावेश असतो..

            जेंव्हा लोकशाहीतील कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळे ही आपल्या घटनात्मक आणि नैतिक कर्तव्यापासून कोणत्याही कारणाने लांब जातात,तेंव्हा त्यांना याबद्दल जाणीव करून देण्यासाठीच लोकशाहीत या वरील व्याख्येनुसार पत्रकारिता ( माध्यमे ) यांची निर्मिती झालेली असते..

           “आणि जर का वरील तिन्ही आधारस्तंभ ढासळायला लागली तर त्याची नैतिक जबाबदारी सुद्धा याच पत्रकारितेची ( माध्यमाची ) असते.

        केवळ समाजाचा ( देशातील नागरिकांच्या समुहाचा ) आरसा म्हणजे माध्यमे ( पत्रकारिता ) नसतात. हे तर नैतिक कर्तव्यापासून बचावात्मक पवित्रा घेणारे सोंग आहे..

           खरे तर समाजात जर लोकशाही व संविधान यांच्या विरोधात किंवा समाजहिताविरोधात दुषकृत्य घडत असतील, तर ते घडू न देण्यासाठी प्रयत्न करणे. आणि चांगले कृत्य घडत असतील तर त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन देणे, हेच तर नैतिक आणि घटनात्मक कर्तव्य या माध्यमाचे आहे.

        लोकशाहीतील संविधान अंमलबजावणीत जर वरील तिन्ही जबाबदार घटक ( मंडळे ) आपल्या घटनात्मक आणि नैतिक कर्तव्यापासून भरकटून कुटनीतीचा वापर करून हुकूमशाही निर्माण करण्याच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देत असेल तर, जनतेत जाऊन, सर्वसामान्य जनतेची ठाम बाजू घेऊन, या तिन्ही मंडळाच्या प्रसंगी विरोधात जाऊन,…

“जनजागृती करणे,

      हेच तर घटनात्मक व नैतिक कर्तव्य या पत्रकारिता (माध्यमाचे ) आहे…

           यासाठीच तर लोकशाहीत यांची निर्मिती झालेली असते…

       एवढेच काय वरील तिन्ही मंडळे घटनात्मक व नैतिक जबाबदारी सांभाळत असतील, देश आणि समाज प्रगती पथावर विराजमान होत असेल तर याचे श्रेय केवळ आणि केवळ या पत्रकारिता ( माध्यमे ) यांनाच जाते…

          आणि जर का याउलट परिस्थिती देशात व समाजात निर्माण झाली तर, तिला जबाबदारही पत्रकारिताच ( माध्यमेच ) असेल…

        एवढे महत्वाचे स्थान या लोकशाहीत पत्रकारितेला (माध्यमाना ) आहे.

         देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या संविधान अंमलबजावणीच्या सुरुवातीच्या काळात या पत्रकारितेने आपली घटनात्मक आणि नैतिक जबाबदारी बऱ्यापैकी सांभाळलेली होती. कारण या पत्रकारिता ( माध्यमे ) यांना विद्वत्तेपेक्षा शिलाची जास्त आवश्यकता असते. तेंव्हाच नैतिकता अंगी येऊन घटनात्मक आणि नैतिक कर्तव्य पार पाडण्याचे बळ यांना मिळते.

          परंतू,जस जसे या देशातील स्वातंत्र्याचे वय वाढत गेले, तस तसे वरील तिन्ही मंडळात कुटनीतीने शिरकाव करून लोकशाही व संविधान आतून पोखरून टाकली. या पत्रकारितेत ( माध्यमात ) सुद्धा कुटनीतीने शिरकाव करुन घेऊन निर्माण झालेल्या प्रवाहात वाहत जाण्याचाच निर्णय यांनी घेतल्यामुळे लोकशाही आणि संविधान आज 2024 च्या काळात ICU मध्ये गेले आहे ….!

           परंतू,आजची पत्रकारिता ( माध्यमे ) सरकारच्या गोदमध्ये विराजमान झालेली असल्यामुळे तिला “गोदी मीडिया ” हे गोंडस नाव प्राप्त झाले आहे. शिवाय राज्य व केंद्र सरकारच्या पुरस्कार,पदव्या, सन्मान,वरच्या जागेवर वर्णी,जाहिराती मिळविण्याचे प्रयत्न. इत्यादी प्रलोभनाला बळी. यातून ज्यांच्या हाती काही लागत नाही. ते वार्ताहर,बातमीदार भ्रष्टाचारी अधीकाऱ्यांना ब्लॅकमेल करून कसेतरी जीवन जगण्याचा प्रयत्न करतात.म्हणून आजची पत्रकारिता षंढ व नपुसंक झालेली आपल्याला दिसते आहे. राजकारणी व नट नट्याच्या आणि भांडवलदारांच्या घरी आजची पत्रकारिता पाणि भरत आहे.

             सर्वसामान्य जनतेचे प्रश्न एक बातमीदार म्हणून मांडते, शपरंतु त्याचा पाठपुरावा करून न्यायापर्यंत कधीच पत्रकारीता आज प्रयत्न करत नाही. तटस्थ पत्रकारीता आज दिसतच नाही.कारण प्रत्येक प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया कोणत्यातरी राजकीय पक्षांनी किंवा भांडवलदारांनी निर्माण केलेले आहेत. म्हणून आजच्या घडीला…

आदरणीय रविशकुमार सर.. 

आदरणीय निरंजन टकले सर…

आदरणीय दीपक शर्मा सर…

आदरणीय अशोक वानखेडे सर..

आदरणीय उमकांत लखेडा सर..

आदरणीय निखिल वागळे सर..

       यांसारख्या निर्भीड पत्रकारांनी जनतेची बाजू घेऊन, भलेही सरकारने त्यांना मोठमोठ्या चॅनलवरून बाद केले असले,तरी त्यांनी सर्वसामान्य जनतेची त्यांनी नाळ सोडली नाही. म्हणूनच यांच्याचमुळे आमची लोकशाही तग धरून आहे…… 

            आज देशात एकही वर्तमानपत्र नाही आता सर्व “बातमीपत्रे आणि जाहिरातपत्रे ” झालेली आहेत. पत्रकारिता पूर्णता संपलेली असल्यामुळे. वरील तिन्ही मंडळाना जे ढासळत चाललेले आहेत त्यांना वठणीवर आणण्याचे सोडा,आता हेच ढासळत चालल्यामुळे आज आमची लोकशाही व संविधान ICU तुन कसे बाहेर काढता येईल हीच चिंता आज आम्हाला (जनतेला )सतावते आहे……..!!!

        याचा विचार सर्वांनी करावा….

        जागृतीचा लेखक 

          अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर, 7875453689..