चौकाचौकात सीसीटीवी ची गरज…

चेतक हत्तीमारे

जिल्हा प्रतिनिधी 

साकोली : समाजामध्ये वाढलेले अपराधालाआळा घालण्यासाठी चौकाचौकात सी सी टी वी कॅमेराची आवश्यकता आहे. एखादी अनुचित घटना घडू नये या साठी शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या चौकामध्ये सी सी टी वी कॅमेरा लावण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

सविस्तर,साकोलीसारख्या शहरात छोटे-मोठे गुन्हे घडत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रश्न महत्त्वाचा ठरला आहे. साकोली सेंदूरवाफा नगर परिषद असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर वसलेली आहे.

साकोली शहर तालुक्याचे ठिकाण आहे. त्यात येथून राष्ट्रीय महामार्ग गेला असल्याने रात्रंदिवस वर्दळ असते. साकोली येथे नेहमी छोट्या-मोठ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना घडतच असतात. सकोलीतील मुख्य चौक लाखांदूर फाटा, ऐकोडी फाटा, नगरपरिषद चौक, बस स्थानक चौक , प्रगती कॉलनी चौक, साईबाबा राईस मिल चौक, सेंदुरवाफा पोलिटेकनिक चौक असे महत्वाचे चौरस्ते असून परिणामी

सीसीटीव्ही कॅमेऱ्या कडे नगर परिषदेने दुर्लक्ष करून अद्याप एकही सी सी टी वी कॅमेरा लावलेला नाही. सी सी टी वी कॅमेरा चे फायदे,अपराधाला आळा घालण्यात मदत,शहरावर नियत्रंण,चोरी घरफोडी करणाऱ्या गुन्हेगाराला चोप बसेल. कर घेणाऱ्या नगर परिषदेला जनतेची सुरक्षा महत्त्वाची वाटत नसल्याने सी सी टी वी कॅमेरा बसवले नसल्याची चर्चा खूप रंगत आहे. एक पंचवार्षिक काळ संपलेला असून अद्यापही नगरपरिषद निष्काळजी का करत आहे. असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे.

पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ ९ फेब्रुवारी २०२२ रोजी संपुष्टात येऊन १० फेब्रुवारी २०२२ ला प्रशासक नेमण्यात आले.

या कालावधीत तीन मुख्याधिकारी साकोली नगर परिषदेमधून बदलून गेले आता चौथे मुख्याधिकारी म्हणून मंगेश वासेकर कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील छोट्या-मोठ्या ग्रामपंचायतींनी सीसीटीव्ही कॅमेरा लावून जनतेची, परिणामी गावाची सुरक्षा करत असताना साकोलीसारख्या तालुक्याच्या शहराच्या ठिकाणी तीन मुख्याधिकारी बदलूनही सीसीटीव्ही कॅमेरे लागू शकले नाहीत. साकोली हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे विविध बँकेच्या शाखा , शाळा,महाविद्यालयं असल्याने ग्रामीण भागातील विध्यार्थी शिक्षणासाठी साकोलीला येतात.

        तसेच विविध मोठे व्यावसायिक आहेत. त्यातल्या त्यात राष्ट्रीय महामार्गावर रात्रंदिवस रहदारी सुरू असते. ग्रामीण भागातील नागरिकांना व्यावहारिक लेन देणं करण्यासाठी तालुक्याला यावे लागते. अशातच काही अनुचित गुन्हेगारीचे प्रकारही घडतच असतात. त्यामुळे जनतेची सुरक्षा महत्वाची ठरते. सध्या कार्यरत असलेले मुख्यधिकरी सी सी टी वी कॅमेरा चौकाचौकात लावणार का? असा प्रश्न जनता नगर परिषदेला विचारत आहे.