उद्योजक राहुल चव्हाण यांच्यावतीने श्रावणी सोमवार निमित्त दुध प्रसादाचे वाटप….

दिनेश कुऱ्हाडे

 उपसंपादक

       आळंदी : 17 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरूवात झाली आहे. भगवान शिवाला अत्यंत प्रिय अलेल्या या महिन्यात श्रावण सोमवारला विशेष महत्त्व असते. या दिवशी शिवभक्त महादेवाची भक्तीभावे पुजा करतात. आज म्हणजेच 21 ऑगस्टला श्रावणातला पहिला सोमवार आहे. यासोबतच नागपंचमीचा सणही आलेला असल्याने या दिवसाचे महत्त्व आणखीच वाढले आहे. या पवित्र दिवसाचे औचित्य साधून उद्योजक राहुल चव्हाण यांच्या माध्यमातून माऊलींच्या तसेच आळंदी क्षेत्राचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दुध प्रसादाचे वाटप करण्यात आले.

        यावेळी आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, आळंदी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रमेश पाटील, मच्छिंद्र शेंडे, उद्योजक प्रकाशशेठ पानसरे, नंदकुमार वडगावकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर, उपाध्यक्ष महादेव पाखरे, अविनाश राळे, सचिन शिंदे, माऊली घुंडरे, अमित डफळ, भागवत काटकर, अनिल जोगदंड, मनोहर दिवाने, पांडुरंग कांबळे उपस्थित होते.