राजेंद्र रामटेके
ग्रामीण तालुका प्रतिनिधी
कुरखेडा…
— जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,गडचिरोली तळमजला,जिल्हाधिकारी कार्यालय,गडचिरोली – 442605..
— टोल फ्री क्रमांक: 1077 दूरध्वनी क्र.: 07132-222031, 35
▶ मोबाईल क्र.: 9423911077 E-mail id:dmcellgadchiroli@gmail.com
— जि.का./क्र.कार्या-३/अका. आव्यक/कावि- १००६/२०२४
दिनांक : २१ जुलै, २०२४
संदर्भ :
1) आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005..
2) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,मंत्रालय,मुंबई यांचेकडील शासन परिपत्रक क्र.संकीर्ण-2019. प्र.क्र.199/ एसडी-2/ दिनांक 02/08/2019
3) शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-2019/प्र.क्र.199/एसडी-2. दि.23/12/2019
आदेश…
(शाळा/विद्यालये बंद ठेवणेबाबत)
ज्याअर्थी,उक्त नमूद अ.क्र.2 अन्वये प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्व सुचनेवरून जिल्ह्यातील त्या-त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेवून,संपूर्ण जिल्ह्याकरिता अथवा जिल्ह्यातील ठराविक स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.
तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत व संदर्भ क्र.2 कडील शासन परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहेत.
ज्याअर्थी,सध्या मान्सून कालावधी सुरु असून मागील ३ दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊसासह अतिवृष्टी झालेली असून वैनगंगा,गोदावरी,प्राणहिता,बांडिया,इंद्रावती इ.नद्यांच्या पाण्याची पातळी ही वाढत असून सदर पाणलोट क्षेत्रातील नद्या व नाल्यांना पूर आल्याने ३७ मार्ग बंद आहे.
शिवाय गोसेखुर्द धरणातून सध्या सुरु असलेले विसर्ग वाढविण्याची दाट शक्यता असल्याने जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देणे आवश्यक असल्याची माझी खात्री झालेली आहे.
त्याअर्थी,मी संजय देने,जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,गडचिरोली उक्त संदर्भ क्र. ०१ ते ०३ नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करुन गडचिरोली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीवर उचित प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत गडचिरोली जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा,जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा,अनुदानित व विना अनुदानित शाळा,सर्व आश्रमशाळा,सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र,यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था,औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण गडचिरोली जिल्हा सीमाक्षेत्रामध्ये दिनांक २२ जुलै,२०२४, सोमवार रोजी सुट्टी जाहीर करीत आहे.
सदरील आदेशाचे पालन न करणारी/ उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० तसेच प्रचलित नियम/धोरण/कायदेनुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
सदरचे आदेश आज दिनांक २१/०७/२०२४ रोजी माझे सही व शिक्क्यानिशी निर्गमित करण्यात येत आहे.
(मूळ प्रतीवर स्वाक्षरी असे.)
स्वा /-XXX
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष..
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,गडचिरोली..
*****
प्रत :- माहितीस सविनय सादर…
१. मा. प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, मुंबई
२. मा. विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर
३. मा. संचालक, आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मंत्रालय, मुंबई
*****
माहितीस तथा उचित कार्यवाहीस अग्रेषित..
४. पोलीस अधिक्षक तथा सदस्य जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली.
५. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. तथा सदस्य जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,गडचिरोली..
६. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. तथा सदस्य जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,गडचिरोली..
७. कुलसचिव,गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली…
८. प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी गडचिरोली/भामरागड/एटापल्ली…
९. उपविभागीय अधिकारी (महसूल) गडचिरोली/चामोर्शी/अहेरी/एटापल्ली/देसाईगंज/कुरखेडा १०. कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग तथा सदस्य जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली…
११. सहा. आयुक्त जिल्हा समाजकल्याण, गडचिरोली १२. प्राचार्य औ.प्र.संस्था, गडचिरोली…
१३. जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली यांना निर्देशित करण्यात येते की, व्यापक प्रमाणात प्रसिद्धी देण्यात यावे.
१४. तहसिलदार तथा अध्यक्ष, तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती गडचिरोली/धानोरा/चामोशी/मुलचेरा/ अहेरी/सिरोंचा/एटापल्ली/भामरागड/आरमोरी/देसाईगंज/कुरखेडा/कोरची..
१५. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जि.प. गडचिरोली यांना निर्देशित करण्यात येते की तातडीने सर्व संबंधितांना कळविण्यात यावे.
१६. आगार व्यवस्थापक एमएसआरटीसी, गडचिरोली..
१७. मुख्याधिकारी, (सर्व) नगरपरिषद/नगर पंचायत, जि. गडचिरोली…
१८. सर्व संबंधित विभाग/अधिकारी (जिल्हा गडचिरोली)..
स्वा/-XXX
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष..
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,गडचिरोली…