पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
देसाईगंज :- सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून गेल्या दोन-चार दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत असून गोसेखुर्द व इतर धरणांचे संपूर्ण दरवाजे उघडण्यात आल्याने नदी – नाले तुडूंब भरून वाहत आहेत. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये करीता आपत्ती व्यवस्थापन व विविध विभागातील अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे असे निर्देश खा. नामदेवराव किरसान यांनी दिले.
दि. २१ जुलैला चिमुर-गडचिरोली निर्वाचन क्षेत्राचे खा. नामदेवराव किरसान हे देसाईगंज येथे आले असता त्यांनी प्रथम विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत पुरसदृष्य परिस्थिती निर्माण होण्यापुर्वी आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क राहुन पुलावरून पाणी वाहत असलेल्या पुलावर अनुचित घटना घडू नये याची काळजी घ्यावी. असे तहसिलदार डूडूलकर यांना निर्देश दिले.
तसेच शंकरपुर-चोप या मार्गावरील नाल्याच्या दोन्ही भागातील रस्ता उंच करण्याच्या सुचना सा.बां. चे अभियंता माळी यांना दिले. सोबतच शहरातील ज्वलंत प्रश्न असलेल्या रेल्वे भुमिगत पुलातील पाण्याच्या निचरा होण्याकरीता काय उपययोजना करता येईल याची माहिती जाणून घेत मुख्याधिकारी न.प. देसाईगंज व रेल्वे विभागाचे अधिकारी चंदनखेडे यांना तात्काळ बोगद्यातील प्रश्न सोडविण्याच्या सुचना देत खा. किरसान यांनी प्रत्यक्ष रेल्वे भुमिगत पुलात भरलेल्या पाण्याची पाहणी केली.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी आ. आनंदराव गेडाम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, तालुका उपाध्यक्ष संजय करांकर, माजी पं.स.उपसभापती नितीन राऊत, काँग्रेस नेते रामदास मसराम, डॉ. शिलुलाई चिमुरकर, डॉ. आशिष कोरेटी, वामनराव सावसाकडे, माजी नगराध्यक्ष जेसा मोटवाणी, माजी नगरसेवक आरिफ खानानी, गणेश फाफट, हरिश मोटवाणी, टिकारामजी सहारे, सुरेश तोंडफोडे, यु.कॉ.चे तालुका अध्यक्ष पंकज चहांदे, जगदिश शेंद्रे, पिंकू बावणे, लिलाधर भरें, लतीफ रिजवी, मोहित अत्रे, तांबेश्वर ढोरे, राजेंद्र तुपटे, कैलास वानखेडे, माजी महिला तालुका काँग्रेस अध्यक्ष आरती लहरी, पुष्पा कोहपरे, ममता पैदाम, भारती कोसरे, रजनी आत्राम, गिता नाकाडे, वैष्णवी आकरे, मालता गेडाम, राजकुमार मेश्राम, विजय पिलावान, राजु माटे, घुले, विमल मेश्राम, मनिषा टेटे, महेंद्र खरकाटे, दुर्वास नाईक आदीसह काँग्रेसचे कार्यकर्ता/पदाधिकारी बहुसंख्येंनी उपस्थित होते.
खा.किरसान यांची रासेकर बंधुच्या घरी सांत्वना भेट..
देसाईगंजचे काँग्रेस नेते राजु रासेकर यांच्या मातोश्री चंद्रभागाबाई रासेकर यांचे दि. ३ जुलैला दुःखद निधन झाले. त्यानिमीत्याने खा.नामदेवराव किरसान हे देसाईगंज येथे आले असता त्यांनी प्रथम रासेकर बंधुच्या घरी सांत्वना भेट दिली.