रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी..
चिमूर तालुक्यातील नेरी येथील केशव श्रीरामे व चिमूर येथील ज्ञानेश्वर बरटे हे दोघेही बोथली ते शिरपूर मार्गाने मोटार सायकलने प्रवास करीत होते.
बोथली ते शिरपूर मार्गावर पुल आहे.या पुलावरून नदीच्या पुराचे पाणी वाहत असतांना प्रवासातंर्गत मोटार सायकलने पुलावरून नदी ओलांडायचे ठरवीले.मात्र नदीच्या पुराचा अंदाज नसल्याने त्यांच्या बाईक सह ते दोघेही नदीच्या पुर प्रवाहात वाहून गेले.
पुराच्या पाण्यात वाहून जावून झाडाला लटकून आहेत,अशी माहिती पोलीस पाटील बनसोड यांनी 20 जुलै च्या रात्रो चिमूरचे पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांना दिली.
सदर घटनेची माहिती पोलीस निरीक्षक बाकल यांना होताच त्यांनी क्षणाचाही विलंबन करता पोलीस हवालदार विलास निमगडे,पोलीस शिपाई सचिन खामनकर,शैलेश मडावी,शिवशंकर लांडकर या कर्मचाऱ्याना घेऊन साहित्या सह घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान पुला पासून 100 मीटर अंतरावर एक तर दुसरा 200 मिटर अंतरावर होता. रात्रौची वेळ असल्याने बचाव कार्यात अडचण येत असल्याने शिरपूर येथील पोहणारे सुभाष दहारे व अडेगाव येथील बालू झोडे यांच्या मदतीने पुराच्या पाण्यातून मोठ्या शिताफीने दोघ्यांनाही सुखरुप बाहेर काढण्यात अखेर पोलीसांना यश आले आहे..
चिमूर ठाणेदार संतोष बकाल यांच्यासह सहकारी पोलिसांच्या कर्तव्यदक्ष कार्याची जनमानसात प्रसंशा होत आहे.