“संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षातच सर्व संविधानिक संस्था मोडीत निघत आहेत..!
आणि आम्ही (बुद्धीजीवी वर्ग आणि सर्व सामान्य जनता) मात्र केवळ आमच्याच गोंधळलेल्या मानसिक परिघात चलबिचल अवस्थेत गुमान हात चोळीत बघ्याच्या भूमिकेशिवाय काहीही करू शकत नाही.
ही आमची अवस्था का झाली याचे उत्तर शोधण्याची ही वेळ नक्कीच नाही.आम्हाला उपाय आणि उत्तरे किंवा समस्येचे निराकरणच हवे असते.कारण तो आमचा स्थायी स्वभाव होऊन बसलेला आहें.त्याचे मुख्य कारण म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीची आमच्यावर असलेल्या धार्मिक रूढीचा पगडा,ज्यामुळे आम्ही सदविचारी बनू शकलो नाही. म्हणून ही अवस्था आहें.
परंतू लोकशाहीत मात्र जनतेची जागृत्तेची टक्केवारी जेवढी जास्त तेवढी लोकशाही जिवंत, जेवढी कमी तेवढी नष्ट होण्याच्या मार्गावर.
आज आमच्या वैचारिक मागासलेपणाचा लाभ कुटनीतीने सर्वच संविधानिक संस्थांमध्ये(कायदेमंडळ, कार्यकारिमंडळ, न्यायमंडळ, पत्रकारिता, सी. बी. आय., कॅग, RBI, इत्यादी सर्वच) आणि राजकारण्यांनी राजकीय पक्षांच्या माध्यमातून कायमचे अतिक्रमण केल्यामुळे ही आमची दयनीय अवस्था झालेली आहें.
म्हणून आमच्यात या संविधान आणि लोकशाहीची जागृती आणि त्यातून कृतीतून अविष्कार घडू शकला नसल्याने आज आम्हाला ही वरील मंडळी तोंड दाबून बुक्क्याचा मार देत आहें. ही संविधानविरोधी शक्ती स्वातंत्र्य, समता,न्याय आणि बंधुता या लोकशाही मूल्यांवर हवी होताना दिसत आहें…….
हे सर्व उघड्या डोळ्याने एखाद्या सच्चा आंबेडकरवादी, संविधाननिष्ठ, मानवतावादी व्यक्ती किंवा व्यक्तीसमूह पाहू शकतो..?
अवघ्या 75 वर्षांपूर्वी झालेला संविधान आणि लोकशाहीचा सूर्योदय केवळ 75 वर्षात सूर्यास्त पाहू शकतो…..?
कधीच पाहू शकत नाही.आम्ही तर कधीच पाहू शकत नाही……
म्हणून कर्तव्यात मी आणि हक्कात आम्ही या तत्वानुसार येत्या 15 ऑगस्ट2024 पासून मी या कुटनीतीला देशातून कायम स्वरूपी संपविण्यासाठी एका व्हिजनची छोटीशी सुरुवात करणार आहे.त्यासाठी आपल्याकडून तन,मन आणि धनाची अपेक्षा आहें. ते आपण सहकार्य कराल का.?
“याचे उत्तरे मौन धारण करणारे असो…
नकारार्थी असो…
किंवा सकारात्मक असो..
मी कर्तव्यातून थांबणारा नाही..!
कारण प्रत्येकाने असं स्वतः समजायला हवं की आज माझ्यावर आणि माझ्या देशावर, संविधानावर,लोकशाहीवर जे संकट आलेलं आहे.त्या संकटाला जगाच्या वेशिवर टांगणे हे केवळ माझेच कर्तव्य आहें.
वरील तत्वानुसार मी जीवन समर्पित करणार आहें..
कारण मला सूर्यास्त होऊ द्यायचा नाही…
कारण मानवतावादावर आणि सत्यावर आधारित असलेल्यांचा नेहमीच विजय होत आलेला आहे. हा जागतिक पुरावा इतिहासात दडलेला आहें. त्यासाठी केवळ आपल्याकडे त्याग, संघर्षाची तयारी आणि समर्पणावर आधारित असलेल्या “आत्मविश्वासाचे ” आपण कुबेर असलो पाहिजे……